कौटुंबिक वादातून सावत्र आई व बहिणीकडून मुलाचा खून

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :कौटुंबिक वादातून सावत्र आई व बहिणीने १६ वर्षीय मुलाचा खून करून मृतदेह विहिरीत टाकून दिल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. यामुळे तब्बल दोन महिन्यांनंतर लोणी पोलिसांत खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप कोणाला ताब्यात घेतलेले नाही.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
ऋषिकेश रामेश्वर शिंदे मृत मुलाचे नाव आहे. वैशाली रामेश्वर शिंदे व गायत्री रामेश्वर शिंदे (रा. कोल्हार बुद्रुक) अशी संशयितांची नावे आहेत. याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी : दि. २४ फेब्रुवारी रोजी शालेय शिक्षण घेत असलेला ऋषिकेश रामेश्वर शिंदे (वय १६) याचा मृतदेह कोल्हार येथील रानशेंडा परिसरातील रवींद्र दत्तात्रय खर्डे यांच्या शेतीमधील विहिरीत आढळून आला होता. 

त्यानंतर लोणी पोलिसांत आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. सदर कुटुंब हे याच ठिकाणी शेतीची कामे करीत होते. मात्र, तपासादरम्यान दोन महिन्यांनंतर मयत ऋषिकेशच्या आईने माझ्या मुलाचा विहिरीत पडून मृत्यू झाला नसून त्याचा खून झाला आहे. त्याची सावत्र आई वैशाली व बहिण गायत्री यांनीच संगनमताने त्याचा खून केल्याचा संशय व्यक्त केला.

याप्रकरणी त्याची आई सुनीता रामेश्वर शिंदे (रा. कोल्हार) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सावत्र आई व बहिण यांच्याविरूद्ध लोणी पोलिसांत गु.र.नं. ८६/१८ भादंवी कलम ३०२, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे करीत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.