३४ हजार कोटींची कर्जमाफी सिद्ध करा फडणवीस सरकारला आव्हान !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :फडणवीस सरकारने जाहीर केलेली छत्रपती शेतकरी सन्मान कर्जमाफी योजना व सातत्याने दिलेले आकडे खोटे अाहेत. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्याप्रमाणे सदर कर्जमाफी ३४ हजार कोटी रुपयांची नाही. असा दावा करत असल्यास सरकारने ती सिद्ध करावी, असे आव्हान काँग्रेस पक्षाने सरकारला दिले.


 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा Ahmednagarlive24 App https://goo.gl/A1KePS 

यासंदर्भात बोलताना काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत म्हणाले की, कर्जमाफी योजना जाहीर करण्याआधी राज्यस्तरीय बँकर्स समितीने ३० जून २०१६ पर्यंत राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांची यादी सरकारला दिली होती. या यादीमध्ये ८९ लाख शेतकऱ्यांचे ३४ हजार कोटी रुपयांचे कर्ज थकीत आहे असे स्पष्ट होते. मुख्यमंत्र्यांनी या यादीच्या आधारे कर्जमाफी योजना जाहीर केली, परंतु सदर योजना जाहीर केल्यानंतर काँग्रेस पक्षाने हे सर्व आकडे २००१ पासून थकबाकीदार असणाऱ्या शेतकऱ्यांचे आहेत व सरकार केवळ २०१२ ते २०१६ या चार वर्षांतील थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफी देत आहे हे सप्रमाण सिद्ध केले. 

सरकारने गुपचूपपणे कर्जमाफीचा कालावधी तीन वर्षांनी वाढवला. परंतु लाभार्थींची संख्या मात्र वाढली नाही. यातूनच सरकार खोटे बोलत होते हे सिद्ध होते. काँग्रेस पक्षाने २००१ पासूनच्या सर्व थकबाकीदार शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणी सातत्याने लावून धरली होती. मात्र आता जवळपास १० महिन्यांनंतर 
कर्जमाफीचा कालावधी पुन्हा वाढवून २००१ पर्यंत करण्यात आला. 

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.