अकोले तालुक्यात पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :सासू, सासरा व पत्नीच्या त्रासाला कंटाळून तालुक्यातील अकोले येथील रवींद्र मच्छिंद्र गिरी यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. मयत गिरी यांच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी तिघाविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा नोंदविला आहे. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
पोलिसांनी रवींद्रची पत्नी व सासूला अटक केली आहे. न्यायाधीशांनी दोघींना सात दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. अकोले येथील रवींद्र गिरी यांची सासूरवाडी गावातीलच आहे. रवींद्र गिरी यांनी बुधवारी रात्री त्यांच्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनास्थळी पोलिस गेल्यानंतर रवींद्र याच्या पॅंन्टच्या खिशात चिठ्ठी सापडली. 

त्यामधे रवींद्र याने मला पत्नी निर्मला, सासू शोभा गोसावी, सासरा विठ्ठल गोसावी हे तिघेजण सतत शिवीगाळ करून दमदाटी करीत असत. त्यांच्या त्रासाला कंटाळून मी आत्महत्या करीत आहे. पोलिसांनी रवींद्रची पत्नी ,सासू व सासरा यांच्याविरुद्ध आत्महत्येस संगणमताने प्रवृत्त करण्याचा गुन्हा नोंदविला आहे. मयताची आई लीलाबाई मच्छिंद्र गिरी यांनी फिर्याद दिली आहे. 

पोलिसांनी गुरुवारी मयताची पत्नी निर्मला रवींद्र गिरी व सासू शोभा विठ्ठल गोसावी यांना अटक करून न्यायालयात हजर केले. सरकारी वकील ॲड. शिवाजी दराडे यांनी न्यायालयासमोर बाजू मांडली. येथील प्रथमवर्ग न्यायाधीश ज्योती सरपाते यांनी दोन्ही संशयित आरोपींना सात दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पोलिस उपनिरीक्षक पुंडलिक पावसे तपास करीत आहेत. 

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.