केडगाव दुहेरी हत्याकांडात माझा संबंध नाही - भानुदास कोतकर

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :केडगाव दुहेरी हत्याकांडात माझा संबंध नाही. राजकारणातून संन्यास घेतलेला आहे, अशा आशयाचा अर्ज लॉटरी विक्रेता अशोक लांडे खूनप्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झाल्यानंतर जामिनावर असलेल्या भानुदास कोतकरने वकिलामार्फत पोलिस अधीक्षकांना दिला आहे.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
केडगाव येथे शिवसेनेचे उपशहरप्रमुख संजय कोतकर, वसंत ठुबे यांच्या हत्येच्या गुन्ह्यात काँग्रेसचा माजी शहराध्यक्ष भानुदास कोतकर याचे नाव आहे. या गुन्ह्यात संबंध नसून, राजकीय कारणातून अडकविण्यात आले असल्याचा अर्ज भानुदास कोतकरने नुकताच आपल्या वकिलामार्फत अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांना दिला आहे.

'मुंबई येथे राहत आहे. राजकारणातून मी संन्यास घेतला आहे. दुर्धर आजाराने आजारी असल्याने मुंबई, पुणे येथील हॉस्पिटलला उपचार घेत आहे. केडगाव येथील दुहेरी हत्याकांडाशी माझा संबंध नाही. केवळ राजकारणातून या गुन्ह्यात अडकविण्यात आले असल्याचे त्याने अर्जात म्हटले आहे.

लांडे खूनप्रकरणात भानुदास कोतकवर व त्याच्या तीन मुलांना जन्मठेपेची शिक्षा ठोठाविण्यात आली आहे. आजारपणामुळे कोतकर हा जामिनावर आहे. त्याला नगर जिल्ह्याबंदी असल्याने तो मुंबईत राहत आहे. केडगाव येथील हत्याकांडाचा तपास करताना माजी उपमहापौर सुवर्णा कोतकर हिने सासरे भानुदास कोतकर यांना फोन केल्याचे उघडकीस आले आहे. 

हत्याकांडाच्या दिवशी या दोघांचे तीन ते चार वेळा फोन झाल्याचे कॉल डिटेल्यवरून उघडकीस आले आहे. या दोघांमध्ये नेमके काय संभाषण झाले, याबाबत माजी उपहापौर सुवर्णा कोतकरकडे पोलिस चौकशी करणार आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.