फसवणूकप्रकरणी पोलिसासह तिघांवर गुन्हा दाखल.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :महिंद्रा पिकअप गाडी विक्रीत फसवणूक झाल्याप्रकरणी काल न्यायालयाच्या आदेशावरून श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात एका पोलीस कर्मचाऱ्यासह तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

----------------------------
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा Ahmednagarlive24 App https://goo.gl/A1KePS 
-------------------------------
याबाबत तालुका पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की तालुक्यातील उंदिरगाव येथील संजय बांद्रे (वय ३६) यांनी फिर्याद दिली. यात म्हटले की, युदिष्ठीर दिलीप शेकटकर (वय ४२, रा. वॉर्ड क्र. २, श्रीरामपूर) यांच्याकडून बांद्रे यांनी महिंद्रा बोलेरो पिकअप (नं. एमएच १७ एक्यू ५१३९) विकत घेतली होती. 

या व्यवहाराच्या करारनाम्यासाठी श्रीरामपूर येथील ॲड. आर. एन. शेख यांच्याकडे नोटरी नोंदवण्यात आली होती. त्यात कर्जाचे हप्ते बांद्रे यांनी भरायचे ठरले. त्यानुसार ते त्यांनी पूर्ण भरले. त्यानंतर गाडी नावावर करून घेण्यासाठी शेकटकर यांना विनंती केली असता त्यांनी नकार दिला. 

त्यानंतर संदीप भागवत बारसे (४५, रा. जेऊर कुंभारी, ता. कोपरगाव) यांना बांद्रे यांनी गाडी करारावर करारनामा करून दिली. त्यात ठरल्याप्रमाणे उर्वरीत रक्कम देण्यात बारसे यांनी असमर्थता दर्शवली. त्यांनी ती गाडी परत दिली.

यानंतर दरम्यानच्या काळात शेकटकर व बारसे यांनी संगणमत करून पोलीस कर्मचारी खळेकर यांची साथ घेऊन बांद्रे यांच्या घरी जाऊन त्यांच्या घरच्यांना दमदाटी केली व खळेकर हे पोलीस असल्याचा धाक दाखवून गाडी घेऊन गेले व फसवणूक केली.

या फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाण्यात शेकटकर, बारसे व खळेकर यांच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नं. ९४/२०१८ नुसार भा.दं.वि. कलम ४२०, ५०४, ५०६, ३४ अन्वये श्रीरामपूर कोर्टाच्या आदेशावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक पथवे हे करीत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.