भाजपकडून शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचेच काम - आ.थोरात.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :साखर कारखानदारीत रात्रंदिवस अनेक चाके फिरत असतात. अनेक लोक राबत असताना १७५ दिवसांचा हंगाम निर्विघ्नपणे पार पडला असून विक्रमी ११ लाख ४१ हजारांचे गाळप केले आहे. ऊस हेच शाश्­वत ठरणारे पिक असून सध्या भाजप सरकारकडून सहकार व सर्वसामान्य शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचे काम सुरु असल्याची टिका राज्याचे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

----------------------------
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा Ahmednagarlive24 App https://goo.gl/A1KePS 
-------------------------------
संगमनेर येथील सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या सन २०१७-१८ या वर्षीच्या गळीत हंगामाची सांगता समारंभात ते बोलत होते. याप्रसंगी आ. थोरात म्हणाले कि, यावर्षी राज्यात सर्वत्र चांगला पाऊस झाल्याने ऊस उत्पादन वाढले. येथे साखर उतारा ही ११.४८ इतका मिळाला. १७५ दिवस कारखाना निर्विघ्नपणे चालला यात परमेश्­वराचे आशिर्वाद, शेतकऱ्यांचे कष्ट, अधिकारी, कामगार, ऊस तोडणी मजूर या सर्वांचे मोठे योगदान आहे. ३० मेगावॅट विज निर्मितीतून कारखान्याला चांगले उत्पन्न मिळाले आहे. काटकसर व गुणवत्ता कायम जपताना चांगला भाव शेतकऱ्यांना दिला आहे.

या हंगामात उत्पादन खुप काढले, मात्र साखरेचे भाव २५०० रुपयांपर्यंत खाली उतरले आहे. उत्पादन खर्च भागवून शेतकऱ्यांना चांगला भाव देणे अवघड झाले आहे. सध्याच्या सरकारचे धोरणे अगदी चुकीचे आहे. ग्राहकांना स्वस्त देण्याच्या नादात शेतकरी भरडला जात आहे. टोमॅटो, कांदा, डाळिंब, तूर या सर्व पिकांचे भाव कोसळले आहे. एकमेव शाश्वत दुध व ऊस उत्पादनातही मोठी अडचण शेतकऱ्यांची झाली आहे. 

एफआरपी द्या असे सांगताना साखरेला २५०० रुपये भाव असेल तर काय करणार? दुधाबाबत खासगी दूध संघावाले अगदी १५ रुपये लिटरने दूध खरेदी करतात. त्यांना नियम व बंधने नाहीत. राजहंस सहकारी दुध संघ मात्र चांगल्या दराने दुध खरेदी करत आहे. ग्राहकांना स्वस्त देण्यासाठी त्या उत्पादनावर अनुदान द्यावे. मात्र शेतकऱ्यांना मारु नये. बुलेट ट्रेन, समृद्धी महामार्ग, मेट्रो सिटी पाहताना शेतकरी व ग्रामीण माणसांकडे सरकारने पुर्ण दुर्लक्ष केले आहे. कर्जमाफीत मोठा गोंधळ केला आहे. सरकार कुणाचे ही असो आईच्या भूमिकेतून शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे राहिलेच पाहिजे,असेही ते म्हणाले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.