दुहेरी हत्याकांडातील आरोपीचा उपचारादरम्यान मृत्यू.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :रंगपंचमीच्या दिवशी पत्नी व तीन महिन्याच्या चिमुकलीचा खून करणाऱ्या आरोपीचा पुण्याच्या ससून रुग्णालयात बुधवारी दुपारी १ वा. मृत्यू झाला.कोपरगाव येथील खडकी भागातील गणेश भिमराव खरात (वय ३०) याने (दि.६ मार्च २०१८) रंगपंचमीच्या दिवशी सकाळी पत्नी सुकेशनी व तीन महिन्याची मुलगी सोनिया यांचा कुऱ्हाडीने घाव घालून खुन केला होता. 

----------------------------
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा Ahmednagarlive24 App https://goo.gl/A1KePS 
-------------------------------
त्याच्या हल्ल्यात सासू रुख्मीणी गवई या गंभीर जखमी झाल्या होत्या. हत्याकांडानंतर आरोपी खरात कोपरगाव शहर पोलीसांत स्वत: हजर झाला. त्याच्या विरोधात कोपरगाव शहर पोलीसांत दुहेरी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.तेव्हापासुन आरोपी गणेश खरात हा कोपरगाव उपकारागृहामध्ये होता. कैद्याची संख्या वाढल्याने खरातसह ३० कैद्यांना १० एप्रिल २०१८ रोजी पुण्याच्या येरवडा कारागृहात स्थलांतरीत करण्यात आले होते.

काल (बुधवार, दि. २५ एप्रिल २०१८) रोजी सकाळी शारीरीक त्रास होत असल्याने त्यास येरवडा कारागृह प्रशासनाने त्याला ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.दुपारी १ वाजण्याच्या सुमारास त्याचा मृत्यू झाल्याची माहिती येरवडा कारागृह प्रशासनाने कोपरगांव उपकारागृह अधिकारी रविंद्र देशमुख यांना दिली. खरात याच्या पश्‍चात दोन छोटी मुले, वृद्ध आई, आजी, भाऊ असा परिवार आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.