जातेगाव घाटात अनोळखी मृतदेह आढळला.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :पारनेर तालुक्यातील पुणे -नगर महामार्गावरील जातेगाव घाटालगतच्या वनविभागाच्या हद्दीत अंदाजे ५० ते ५५ वर्षे वयाच्या अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला. आबासाहेब विठ्ठल रेपाळे रा. जातेगाव यांनी दिलेल्या खबरीवरून सुपा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. 
----------------------------
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा Ahmednagarlive24 App https://goo.gl/A1KePS 
-------------------------------
घटनास्थळी सहाय्यक पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया, पोलिस निरीक्षक हणुमंत गाडे, उपनिरीक्षक बी.जेपठाण, सहाय्यक फौजदार शिवाजीराव ढवळे आदींनी भेट देऊन पंचनामा केला.त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पारनेर ग्रामीण रुग्णालयात पाठविला. पुढील तपास सहाय्यक फौजदार शिवाजीराव ढवळे करीत आहेत. या व्यक्तीबाबत कोणास काही माहिती असल्यास त्यांनी त्वरित संपर्क साधण्याचे आवाहन सुपा पोलिसांनी केले आहे.
-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.