फ्लॅट घेण्यासाठी माहेरहून पैसे आणावेत म्हणून विवाहितेचा छळ

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :फ्लॅट घेण्यासाठी माहेरहून दोन लाख रुपये आणावेत, या कारणासाठी विवाहितेचा छळ केल्याच्या आरोपावरून सात जणांविरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

-------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
-------------------------
फिर्यादी पूजा प्रविण यादव (वय २३, रा. खडकेवाके, ता. राहाता, हल्ली रा. निंभेरे, ता. राहुरी) या विवाहितेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले, की पती प्रविण गोरख यादव, सासरे गोरख निवृत्ती यादव, सासू सुनिता गोरख यादव, दीर प्रसाद गोरख यादव, चुलत सासरे सुभाष गेणुजी यादव यांनी नेहमी शिवीगाळ, दमदाटी करून शारीरिक व मानसिक त्रास दिला.

सासरच्या लोकांबरोबर सुनिल लहानु निर्मळ (रा. चिंचोली फाटा, ता. राहुरी) व ज्ञानेश्वर आप्पासाहेब मुसमाडे (रा. कणसेवाडी, ता. राहुरी) यांनी पतीस प्लॅट घेण्यासाठी दोन लाख रुपये घेऊन ये, असे सांगून वरील लोकांनी घरातून हाकलून दिले तसेच मला आणि आई व वडिलांना शिवीगाळ करून दमदाटी केली. यावरून वरील सात जणांविरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यात ४९८ (अ), ३२३, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

--------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.