विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकास सात वर्षे कारावास

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :प्राथमिक शाळेतील विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकास नेवासा न्यायालयाचे अतिरीक्त सत्र न्यायाधीश ए.एल.टिकले यांनी सात वर्षे कारावास व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. 


-------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
-------------------------
या खटल्याची सविस्तर माहिती अशी, नेवासा तालुक्यातील प्राथमिक शिक्षक फक्कड नारायण शिंदे (४१, रा.खरवंडी) हा शाळेतील अल्पवयीन मुलींशी लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करीत असे. पिडीत विद्यार्थिनींनी कोठे वाच्यता करू नये म्हणून त्यांना धमकावीत होता. हा गैर प्रकार एका विद्यार्थिनीकडून पालकांना समजल्यावर पालकांनी शाळेतील इतर विद्यार्थिनींना विश्वासात घेऊन विचारणा केली असता आरोपी शिंदे याचा गैरप्रकार उघडकीस आला. 

या प्रकरणी शनिशिंगणापूर पोलीस ठाण्यात फक्कड शिंदे याच्या विरुध्द भादंवि कलम ३५४ (अ), ५०६ व बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम कलम ८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक व्ही.डी.पेठेकर यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्याची सुनावणी अतिरीक्त सत्र न्यायाधीश ए.एल.टिकले यांच्या समोर झाली. 

सरकारी पक्षातर्फे पिडीताचे व साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले. न्यायालयासमोर आलेल्या पुराव्यावरून व सरकारी पक्षातर्फे केलेला युक्तीवाद ग्राह्य धरून आरोपी शिक्षकास बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम कलम १० अन्वये ७ वर्षे सश्रम कारावास व दहा हजार रुपये दंड , दंड न भरल्यास सहा महिने कारावास व भादंवि कलम ५०६ अन्वये सहा महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. 

सरकारी पक्षातर्फे अतिरीक्त सरकारी वकील एम.आर.नवले यांनी काम पाहिले. त्यांना पो.हे.कॉ.रेवणनाथ मरकड, पो.नाईक एस.बी.बटुळे, सहा.फौजदार बी.एन.गडाख, पो.नाईक एम.पी.शिंदे, पो.कॉ.एम.जे.हजारे, पो.कॉ.जी.के.अडांगळे यांचे सहकार्य लाभले.

--------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.