सावकारांचे हस्तक 'बडे' असल्याने बाळासाहेब पवार आत्महत्या प्रकरण दाबण्याचा प्रयत्न.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नगरमधील उद्योजक बाळासाहेब पवार यांच्या आत्महत्याप्रकरणाची जिल्ह्याबाहेरील स्वतंत्र यंत्रणेद्वारे चौकशी करण्याची मागणी शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे बुधवारी करण्यात आली. याशिवाय केडगाव येथील दहशतीच्या वातावरणाबाबतही स्वतंत्र तक्रारी करून येथे स्वतंत्र पोलिस ठाणे गरजेचे असल्याचेही म्हणणे मांडण्यात आले.उद्योजक पवार यांनी आत्महत्या केली असून, या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 


-------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
-------------------------
या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय शेतकरी मराठा महासंघाचे अध्यक्ष संभाजी दहातोंडे यांनी ठाकरे यांना भेटून निवेदन दिले. 'मराठा क्रांती मोर्चाचे आयोजक बाळासाहेब पवार यांनी शहरातील सावकारांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली आहे, शहरातील सावकारांचे हस्तक बडे लोक असल्याने हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत आहे'.

 असा दावा दहातोंडे यांनी या निवेदनात केला असून, 'पवार यांच्या मृत्यूची जिल्ह्याबाहेरील विशेष पोलिस यंत्रणा नेमून चौकशीची कारवाई केली जावी', असेही स्पष्ट केले गेले आहे. दरम्यान, पवार कुटुंबांच्या सदस्यांपैकीही काहींनी ठाकरेंची भेट घेऊन त्रयस्थ यंत्रणेद्वारे चौकशीची मागणी केल्याचे सेना सूत्रांनी सांगितले.
--------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.