खोटारड्या लोकप्रतिनिधींना पुढील निवडणुकित गनिमी कावा करुन पाडण्याचा इशारा

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :अनेक घोषणा करुन अंमलबजावणी न करणार्‍या व खोटी आश्‍वासने देणार्‍या भाजप सरकारच्या निषेधार्थ मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने मंगळवार दि.1 मे कामगार दिनी हुतात्मा स्मारक येथे शेंडी शेंदूर कृष्णवीवर ब्लॅक गॅझेट प्रसिध्द केला जाणार आहे. हुतात्मा स्मारक येथे नुकतेच झालेल्या घरकुल वंचितांच्या बैठकित ही घोषणा करण्यात आली. सत्ताधार्‍यांनी अच्छे दिनाचे स्वप्न दाखवून सर्वसामान्यांना शेंडी लावायचे काम केल्याचा आरोप करीत, खोटी आश्‍वासने देणार्‍या लोकप्रतिनिधींना पुढील निवडणुकित गनिमी कावा करुन पाडण्याचा इशारा देण्यात आला. 

-------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
-------------------------
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परदेशातील काळा पैसा भारतात आनण्याचे व सर्वसामान्य जनतेला अच्छे दिनचे स्वप्न दाखविले. सत्ता आल्यानंतर ही आश्‍वासने खोटी ठरली. साडेतीन वर्षापुर्वी घरकुल वंचितांसाठी पंतप्रधान आवास योजानेची घाषणा करण्यात आली. घरकुल वंचितांच्या याद्या तयार करुन त्या केंद्राकडे पाठविण्यासाठी साडेतीन वर्षाचा कालावधी लोटला. तर घरे केंव्हा होणारा? हा प्रश्‍न अनुत्तरीत राहून ही घोषणा देखील फसवी ठरु पाहत आहे. स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षानंतर देखील अनेक नागरिकांना निवारा नसल्याने ते झोपडपट्टीत नाल्याच्या कडेला राहतात ही मोठी शर्मेची बाब असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.

पंतप्रधान आवास योजना कार्यान्वीत करण्यासाठी किंवा घरकुल वंचितांना भूमीगुंठा देण्यासाठी अनेकवेळा पाठपुरावा करण्यात आला. फक्त आश्‍वासनांचा पाऊस पाडून, भाजप सरकारने शेंडया लावायचे काम केले. अनेक लोकप्रतिनिधी सर्वसामान्यांच्या प्रश्‍नाबद्दल काहीच बोलत नसून, ते मंत्रीमंडळातील दगड असल्याची प्रचिती येत आहे. अशा दगडांना शेंदूर लावून सत्तेवर आनण्यात आले. हे सरकार कृष्णवीवर ठरले आहे. पालकमंत्री राम शिंदे यांनी घरकुल वंचितांच्या प्रश्‍नासाठी एकही बैठक घेतली नाही. गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहेता यांनी घरकुल वंचितांसाठी काही कार्य न केल्याने ते निक्कमे ठरल्याचा आरोप अ‍ॅड.कारभारी गवळी यांनी केला. 

घरकुल वंचितांची घरे होण्यासाठी हायब्रीड लॅण्ड पुलिंग शिवाय पर्याय नाही. शासनाला अधिक गुंतवणुक न करता घरकुल वंचितांचा प्रश्‍न मार्गी लावता येणार आहे. यासाठी जागा उपलब्ध करुन देणार्‍या मुळ शेतकर्‍यांचा पडिक जागेच्या मोबदल्यात मोठा फायदा होणार असल्याची भुमिका संघटनेने मांडली आहे. या बैठकीप्रसंगी शाहिर कान्हू सुंबे, विठ्ठल सुरम, हिराबाई ग्यानप्पा, शारदा जंगम, सुमन ओमदे, रंजना गायकवाड, नंदा मोरे, अंबिका जाधव, कांताबाई साळवे, सोनाली तोरडमल, सविता बोरुडे, हिराबाई भोसले, लता शिंदे, लिला रासने, फरिदा शेख, काजल सुतार आदि उपस्थित होते.
--------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.