विनयभंग करणार्‍या पारनेर तालुक्यातील सरपंचाला पोलिसांकडून अभय.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :पारनेर तालुक्यातील वाळवणे येथील सरपंच व त्यांच्या कुटुंबीयांवर विनयभंग व अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल असताना देखील राजकीय दबावापोटी त्यांच्यावर कारवाई केली जात नसल्याने पिडीत शिंदे कुटुंबीय शुक्रवार दि.27 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालया समोर प्राणांतिक उपोषणास बसणार असल्याची माहिती अश्‍विनी शिंदे यांनी दिली.


-------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
-------------------------
पारनेर तालुक्यातील वाळवणे येथे सोमवार दि.9 एप्रिल रोजी सायंकाळी सरपंच उत्तम पठारे व त्याची बायको अनिता पठारे, पुतण्या दिलीप पठारे व सून निता पठारे यांनी अश्‍विनी शिंदे व सासू शोभा शिंदे यांना जातीवाचक शिवीगाळ करीत पदराला ओढून घराबाहेर काढीत जबर मारहाण केली व विनयभंग केला. या प्रकरणी सरपंचसह पठारे कुटुंबीयांवर सुपा पोलिस स्टेशनला दि.12 एप्रिल रोजी विनयभंग व अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. 

सरपंच उत्तम पठारे याने जागेवरुन शिंदे कुटुंबीयांशी भांडणे सुरु केले आहे. सरपंचच्या राजकीय दबावापोटी पोलिस प्रशासन त्यांच्यावर कारवाई करीत नसून, अनुसुचित जातीचे असल्याने आरोपी व त्यांचे नातेवाईक दमबाजी करुन आमच्यावर अन्याय करीत असल्याचे प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात अश्‍विनी शिंदे यांनी म्हंटले आहे. आरोपींवर कायदेशीर कारवाई होत नाही तो पर्यंन्त शिंदे कुटुंबीय प्राणांतिक उपोषण करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
--------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.