भानुदास कोतकरच्या घरात शिजला हत्याकांडाचा कट !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- केडगाव येथील शाहूनगर भागात शिवसेनेचे शहर उपप्रमुख संजय कोतकर व कार्यकर्ता वसंत ठुबे यांच्या हत्याचे कट भानुदास कोतकर याच्या घरात शिजल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. त्यामुळे या हत्याकांडाच्या तपासातील गुंता वाढण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. 
----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
दरम्यान, या हत्याकांडाचा प्रमुख सूत्रधार नगरसेवक विशाल कोतकर याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्यासह रवींद्र खोलमला न्यायादंडाधिकारी सो.सु.पाटील यांनी 27 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. या हत्याकांड प्रकरणी आतापर्यंत 9 जणांना अटक करण्यात आली आहे.

7 एप्रिल रोजी केडगाव उपनगरातील शाहूनगर भागात सायंकाळी साडेपाचच्या कोतकर व ठुबे यांची गोळ्या घालून व कोयत्याने मारहाण करून हत्या करण्यात आली. या हत्याकांडाचा प्रमुख सूत्रधार असलेल्या कोतकरला पहाटे साडेतीनच्या सुमारास कामरगाव शिवारात अटक करण्यात आली. कोतकर याच्यासह खोलमला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. खोलमची पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्याला न्यायालयात आणण्यात आले.

या वेळी तपासी अधिकाऱ्यांसह सरकारी वकील सीमा देशपांडे यांनी न्यायालयास दोघांसाठी 7 दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी केली. खोलम व संजय कोतकर यांचा फोनवर वाद झाला. खोलम यांनी फोनवर झालेल्या संभाषणाची रेकॉर्डिंग विशाल कोतकरला ऐकविली. संजय कोतकर व खोलम यांच्यातील वादाची माहिती विशाल कोतकरला मिळाल्यानंतर हे दोघे भानुदास कोतकर याच्या घरी गेले;

परंतु भानुदास कोतकर घरी नव्हता. त्यामुळे सुवर्णा कोतकर यांना या खोलम व संजय कोतकर यांच्यातील वादाची माहिती देण्यात आली. त्यानंतर सुवर्णा कोतकर यांनी भानुदास कोतकरला फोनवर माहिती दिली, अशी पोलीस तपासातील माहिती न्यायालयापुढे सादर करण्यात आली.

खोलमचा फोन जप्त करण्यात आला असून या फोनवरून त्याने गुन्ह्यातील इतर कोणकोणत्या आरोपींशी संपर्क केला आहे, त्याबाबत तपास करायचा आहे, खोलमने माहिती दिल्यानंतर विशाल कोतकरने ही माहिती कोणाला सांगितली, गुन्ह्याचा कट कोठे व कसा रचला, याबाबत माहिती मिळवायची आहे, विशाल कोतकरचा फोन जप्त करायचा आहे. 

फरार झाल्यानंतर विशाल कोतकर कोठे होता, याचा तपास करायचा आहे आदी कारणे नमूद करून पोलीस कोठडी देण्याची मागणी पोलिसांनी केली. संदीप गुंजाळ याने विशाल कोतकर व त्यांच्या नातेवाइकांच्या सांगण्यावरून हा गुन्हा केला असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे त्याबाबत ही तपास करणे आवश्‍यक असल्याचे सरकारी वकिलांनी स्पष्ट केले.

या वेळी आरोपींच्या वकिलांनी फोन झालेल्या संवादाची माहिती घेण्यासाठी न्यायालयास अर्ज दिला. या संवादाची माहिती मोबाईल कंपनीकडून केवळ पोलीसांनी मिळते. त्यामुळे खरा काय संवाद झाला याची माहिती पोलिसांनी कंपनीकडून द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायदंडाधिकाऱ्यांनी कोतकर व खोलम या दोघांना 27 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी दिली.

खोलमचे मॅटर मिटवून टाक
खोलम याने वादाची रेकॉर्डिंग विशाल कोतकरला ऐकविल्यानंतर त्याने संदीप गुंजाळला खोलमचे मॅटर मिटवून टाक असे सांगितले होते; परंतु पुढे गुंजाळने काय केले हे विशालला माहिती नाही.

भानुदास कोतकर केडगावला आला होता
विशाल कोतकर व रवींद्र खोलम हे भानुदास कोतकरच्या घरी आले, तेव्हा भानुदास घरी नव्हता; परंतु सुवर्णा कोतकर यांना खोलम व संजय कोतकरच्या वादाची माहिती दिल्यानंतर त्यांनी भानुदास कोतकरला फोनवरून ही माहिती दिली. त्यानंतर भानुदास कोतकर घरी आला होता. त्याच्या घरातच हत्याकांडाचा कट रचला गेल्याचा दावा पोलिसांनी न्यायालयात केला आहे.

आमदार कर्डिलेंना जामीन मंजूर
पोलीस अधीक्षक कार्यालयावर हल्ला केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले आमदार शिवाजी कर्डिले यांना आज दुपारी जामीन मंजूर झाला आहे. 25 हजार रुपयांच्या जातमुचलकावर हा जामीन मंजूर झाला असून दर रविवारी पोलीस ठाण्यात हजेरी लावण्यास सांगितले आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.