अल्पवयीन मुलीचा विनयभंग,परेश खराडेसह तिघांविरुध्द गुन्हा

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी परेश खराडेसह तिघा जणांविरुध्द कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की, शहरातील एका अल्पवयीने मुलीस एप्रिल २०१७ ते दि. २० एप्रिल २०१८ या कालावधीत परेश चंद्रकांत खराडे व त्याचे साथीदार संदेश यशवंत पानसरे व अन्य एका मुलीने अल्पवयीने मुलीने खराडे सोबत प्रेमसंबंध ठेवावेत यासाठी तिचा नगर, पुणे, कोल्हापूर या ठिकाणी पाठलाग करून फोनद्वारे त्रास दिला. 
----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
तसेच खराडे याने मुलीस धमकी देवून तिच्याशी गैरवर्तन केले. दरम्यान आरोपींच्या दहशतीमुळे मुलीच्या आई-वडिलांनी याबाबत कोणतीही तक्रार दाखल केली नव्हती. मात्र अखेर रविवारी (दि.२२) रात्री १० वाजण्याच्या सुमारास याप्रकरणी संबंधित मुलीच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिस ठाण्यात तिघा जणांविरुध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोसई शिरदावडे मॅडम या करीत असून यामध्ये पोलिसांनी मोबाईल फोन व एक चिठ्ठी जप्त केली आहे.
-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.