उभ्या ट्रकवर टेम्पो आदळून दोघे जागीच ठार, एक जखमी

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :रस्त्यावर उभ्या असलेल्या मालट्रकवर पाठीमागून दूध घेऊन जाणारा टेम्पो धडकल्याने झालेल्या अपघातात दोघेजण जागीच ठार झाले, तर एक जण गंभीर जखमी झाला. हा अपघात नगर-मनमाड महामार्गावर पिंपरी निर्मळ शिवारात मंगळवारी पहाटे साडेचारच्या सुमारास झाला. 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
---------------------------
दत्तात्रेय विष्णू जगताप (वय २८, बाभळेश्वर) व संजय सुहास ठुबे (४५, कोपरगाव) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत. बाळू चांगदेव पवार (वय ३८, कोकमठाण) हे जखमी झाले. जगताप हे साईबाबा संस्थानचे सुरक्षारक्षक होते. पहाटे चारच्या सुमारास जगताप ड्युटी संपवून बाभळेश्वर येथे घरी जाण्यासाठी रस्त्यावर येऊन थांबले.

कोपरगाव येथील दूध संघाचा टेम्पो (एमएच १७ एजी ८८७८) शिर्डीकडून बाभळेश्वरकडे जात होता. या टेम्पोतून जगताप निघाले. पिंपरी निर्मळ शिवारात मालमोटार (टी एन ५२ एच ८४७८) थांबली होती. दुधाचा टेम्पो पाठीमागून या मालमोटारीवर आदळला. 

त्यात सुरक्षा रक्षक जगताप व टेम्पोचालक संजय ठुबे हे दोघे जागीच ठार झाले, तर बाळू पवार गंभीर जखमी झाला. लोणी पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक रणजित गलांडे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत क्रेनने दोन्ही वाहने बाजूला करून जखमीला लोणी येथील प्रवरा ग्रामीण रूग्णालयात दाखल केले.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
Powered by Blogger.