मोदी-आसाराम यांच्या गळाभेटीचा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषणाच्या आरोपात जन्मठेपेची शिक्षा झालेल्या आसारामचा एक व्हिडिओ काँग्रेसने जारी केला आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आसारामची गळाभेट घेताना दिसत आहेत. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते, तेव्हाचा हा व्हिडिओ आहे. एका धार्मिक कार्यक्रमाच्या या व्हिडिओमध्ये आसाराम मोदींची स्तुती करताना दिसतो. या व्हिडिओसोबतच अनेक नेते आसाराम समोर साष्टांग नमस्कार करत असल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.


अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
---------------------------
काँग्रेसने साधला निशाणा-
मोदी आणि आसाराम यांचा व्हिडिओ जारी करत काँग्रेसने म्हटले आहे, की व्यक्तीची ओळख ही त्याच्या आसपास असलेल्या लोकांवरुन होत असते.
- काँग्रेसने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर 47 सेकंदांचा व्हिडिओ पोस्ट केला आहे.
- काँग्रेसने ट्विट केल्यानंतर या व्हिडिओला मोठ्या प्रमाणात री-ट्विट केले जात आहे.
- व्हिडिओमध्ये आसाराम उंच आसनावर बसलेला आहे आणि मोदी त्याचा आशीर्वाद घेत आहेत.

मोदी भेटीनंतर आसाराम म्हणाला- मला माझा शिवा भेटला-
व्हिडिओमध्ये मोदींच्या गळ्यात फुलांचा हार आहे आणि ते आसारामच्या शेजारी उभे आहेत. आसारामच्या एका संत्सगस्थळाचा हा व्हिडिओ आहे. सुरुवातील मोदी म्हणतात, ज्या काळात मला कोणी ओळखत नव्हते तेव्हापासून बापूचे आशीर्वाद मला मिळत आहेत.
- आसाराम गुजराती भाषेत म्हणतो, धर्मसत्ता आणि राजसत्तेची जेव्हा भेट होते तेव्हा प्रजेचा बेडा पार होतो. आज मला माझा शिवा भेटला आहे.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
Powered by Blogger.