पाकिस्तानात जन्म ते भारतात १० हजार कोटी संपत्तीचा मालक ! स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु आसारामाचा प्रवास !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोप सिद्ध झाल्याने जोधपूरच्या विशेष न्यायालयाने स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु आसाराम बापूला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. जोधपूर न्यायालयाचा हा निर्णय आसारामच्या साम्राज्याला मोठा धक्का आहे. तब्बल १० हजार कोटींचा मालक असलेल्या आसारमाचा आजवरचा प्रवास अनेक वाद विवांदांनी पूर्ण झाला आहे.


अहमदनगर ब्रेकिंग अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
---------------------------

पाकिस्तानात जन्म, चौथीपर्यंत शिक्षण

आसारामच्या अधिकृत वेबसाईटवरील लघूपटानुसार आसारमचा जन्म १९४१ साली सध्या पाकिस्तानात असलेल्या सिंध प्रांतामधील बेरानी या गावात झाला. त्यांचे नाव आहे असूमल सिरुमलानी. १९४७ मध्ये हिंदुस्थानची फाळणी झाल्यानंतर असूमल आपल्या आई-वडिलांसह गुजरातमधील अहमदाबादमध्ये आला. अहमदाबादमधील मणिनगर भागातील शाळेत त्याने चौथीपर्यंतचे शिक्षण घेतले.

असूमल दहा वर्षांचा होता त्यावेळी त्याच्या वडिलांचे निधन झाले. वडिलांच्या निधनानंतर त्याचे शिक्षण सुटले. त्यानंतर काही किरकोळ नोकऱ्या केल्यानंतर आसुमल ‘अध्यात्मिक शोध’ घेण्यासाठी हिमालयात गेला अशी माहिती त्यांच्यावरील लघूपटात देण्यात आली आहे.

असूमल झाला आसाराम बापू
हिमालायात अध्यात्मिक यात्रे दरम्यानच असूमलला लीलाशाह बापू हे गुरु मिळाले. त्यांनीच असूमलला आसाराम बापू असे नाव दिले. १९६४ नंतर आसाराम अहमदाबादला परतले. त्याने साबरमती नदीच्य काठावर झोपडी बांधून तपश्यर्या सुरु केली.

१९७२ पासून आसारामची लोकप्रियता वाढू लागली. त्याच्या छोट्या झोपडीचे भव्य आश्रमात रुपांतर झाले. त्यानंतरच्या चार दशकांमध्ये देश-विदेशात तब्बल ४०० ठिकाणी आसारामने आश्रम उभारले. आसारामने लक्ष्मी देवीशी लग्न केले. नारायण साई आणि भारती देवी अशी त्याला दोन मुले आहेत. यामधील नारायण साई सध्या जेलमध्ये आहे.

२००८ साली झाला पहिला आरोप
जगभरातील बाबांमध्ये एक ब्रँड झालेला आसाराम बापूच्या अडचणीत २००८ साली पहिल्यांदा सुरुवात झाली. दिपेश आणि अभिषेक वाघेला या आसारामच्या दोन नातेवाईकांचा २००८ मध्ये मोतेरा आश्रमात रहस्यमय पद्धतीने मृत्यू झाला होता .

या प्रकरणात गुजरात सीआयडीने २००९ साली आसारामच्या सात समर्थकांच्या विरोधातखटला दाखल केला होता. आसाराम आश्रमात काळी जादू करतो असा आरोप मृत व्यक्तींच्या नातेवाईकांनी केला होता.

२०१३ साली झाली अटक
आसाराम बापूचे साम्राज्य खालसा होण्यास २०१३ साली सुरुवात झाली. राजस्थानमधील एका अल्पवयीन मुलीने आसारामवर बलात्काराचा आरोप केला. या आरोपानंतर आसारामला अटक करण्यात आली. त्यानंतर ६ ऑक्टोबर २०१३ साली गुजरातमधील दोन बहिणींनी आसाराम आणि त्याचा मुलगा नारायण साईवर लैंगिंक शोषणाचा आरोप केला. या प्रकरणाची सुनावणी अजूनही सुरु आहे.

आसारामवर सुरत आणि अहमदाबादमध्ये आश्रमासाठी जमीन हडपल्याचाही आरोप आहे. आसाराम समर्थकांना बलात्काराच्या प्रकरणातील साक्षीदारांना धमकवल्याच्या प्रकरणातही अटक केली होती. आता जोधपूर न्यायालयाने आसारामला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहेय

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
Powered by Blogger.