शिवसेना नेत्याची पत्नीकडूनच सुपारी देवून हत्या.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :शिवसेना नेते शैलेश निमसे यांच्या हत्येप्रकरणी पत्नी साक्षी निमसे हिला ठाणे ग्रामीण पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. साक्षीसोबत प्रमोद लुटे या आरोपीलाही पोलिसांनी अटक केली आहे. इतर तीन आरोपींचा अद्याप शोध सुरु आहे.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
शैलेश निमसे हे शहापूरमधील शिवसेनेचे उपतालुका प्रमुख होते.भिवंडी तालुक्यातील दिघाशी जवळील देवचोळा येथे शैलेश निमसे यांची निर्घृण हत्या करण्यात आली. हत्येनंतर त्यांची ओळख होऊ नये म्हणून त्यांचा मृतदेह पेटवण्यात आला होता.शैलेश निमसे यांची पत्नी साक्षी हिनेच हत्येची सुपारी दिल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले.

शैलेश निमसे यांचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. त्यावरुन पत्नीसोबत त्यांचे वाद होत असत. पत्नीला ते मारहाण करायचे. यातून साक्षीने हत्येची सुपारी देत, घरातच शैलेश निमसे यांचा गळा दाबून हत्या केली, असे पोलिस तपासात समोर आले.

विशेष म्हणजे, पोलिसांचा तपास भरकटावा म्हणून शैलेशची पत्नी साक्षी हिने जंगली महाराज ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांचा हात आपल्या पतीच्या हत्येत असल्याचा संशय पोलिसांकडे व्यक्त केला होता. मात्र पोलिसांनी उलट तपास करुन सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक बाबींतून हत्येचा उलगडा केला.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.