आ.कर्डिलेना दर रविवारी पोलिस ठाण्यात हजेरी द्यावी लागणार.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :पोलिस अधिक्षक कार्यालय तोडफोडप्रकरणी आ. शिवाजीराव कर्डिलेंसह ॲड. प्रसन्ना जोशी, ॲड. संजय वाल्हेकर, सागर वाव्हळ आणि अलका मुंदडा यांना जिल्हा न्यायालयाने २५ हजाराचा सशर्त जामीन मंजूर केला. दर रविवारी पोलिस ठाण्यात हजेरी, तपासात पोलिसांना सहकार्य करणे, पासपोर्ट जमा करणे अशी अट घालण्यात आली. दरम्यान, जामीन मिळाल्याने आ. शिवाजीराव कर्डिले यांना तुर्त दिलासा मिळाला आहे.

----------------------------
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा Ahmednagarlive24 App https://goo.gl/A1KePS 
-------------------------------
केडगाव येथील दुहेरी हत्याकांडाच्या घटनेनंतर पोलिस अधिक्षक कार्यालयात आ. संग्राम जगताप यांना चौकशी कामी बोलावले असता समर्थक कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात २०० ते २५० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी २८ जणांना अटक करण्यात आली. याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले आ. शिवाजीराव कर्डिले, ॲड. प्रसन्ना जोशी, ॲड. संजय वाल्हेकर, सागर वाव्हळ आणि अलका मुंदडा यांचेवतीने जिल्हा व सत्र न्यायाधीश अशोककुमार भिलारे यांचेसमोर जामीनासाठी अर्ज दाखल केले होते. 

जामीन अर्जावर सोमवारी (दि. २३) न्यायालयात सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकिल ॲड. केदार केसकर, आरोपींच्यावतीने ॲड. नितीन गवारे, ॲड. महेश तवले यांनी युक्तीवाद केला. न्यायालयाने दोन्ही बाजुंचा युक्तीवाद ऐकून मंगळवारी (दि. २४) सुनावणी ठेवली होती. न्यायालयाने आ. कर्डिलेंसह पाच जणांना २५ हजाराचा जामीन अटीसह मंजूर केला. आरोपींनी दर रविवारी सकाळी १० ते १२ या वेळेत भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याला हजेरी देणे, पासपोर्ट जमा करणे, पोलिसांना तपासात सहकार्य करणे, साक्षीदारांवर दबाव आणू नये अशी अट टाकण्यात आली आहे.
-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.