केडगाव हत्याकांड - संदीप गुंजाळ असे करेल, वाटले नव्हते...

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- केडगाव दुहेरी हत्याकांडातील मुख्य सूत्रधार नगरसेवक विशाल कोतकरने आपणच आरोपी संदिप गुंजाळला रविंद्र खोल्लमच्या मदतीसाठी पाठविले. मात्र 'तो असे करेल, वाटले नव्हते...' असे त्याने पोलिस तपासात सांगितले. कोतकरला मंगळवारी (दि. २४) पहाटे पोलिसांनी कामरगाव शिवारात अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता दि. २७ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली. 

----------------------------
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा Ahmednagarlive24 App https://goo.gl/A1KePS 
-------------------------------
केडगाव येथील मनपाच्या प्रभाग क्र. ३२ (ब) मधील पोटनिवडणुकीच्या निकालादिवशी (दि. ७) शिवसेनेचे संजय कोतकर व वसंत ठुबे यांची गोळ्या झाडून व सत्तूरने वार करून हत्या करण्यात आली. या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येऊन पोलिसांनी आ. संग्राम जगतापांसह संदिप गुंजाळ, रवि खोल्लम, बाबासाहेब केदार, बाळासाहेब कोतकर, भानुदास कोतकर बीएम, संदिप गिऱ्हे, महावीर मोकळे यांना अटक केली. या गुन्ह्यात नगरसेवक विशाल कोतकर हा फरार होता. त्याला मंगळवारी (दि. २४) पहाटे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कामरगाव शिवारात अटक केली.

नगरसेवक कोतकरने पोलिसांना सांगितले की, मयत संजय कोतकर यांचे रवि खोल्लम याच्याशी फोनवर वाद झाले होते. सदरचे फोन रेकॉर्डींग खोल्लम याने नगरसेवक विशाल कोतकर याला ऐकविले. त्यानंतर विशाल हा रविंद्रसह भानुदास कोतकर याच्या घरी गेले होते. 

तेथे त्याने सदरचे रेकॉर्डींग सुवर्णा कोतकर यांना ऐकविले. त्यानंतर सुवर्णा कोतकर यांनी भानुदास कोतकर यांना फोन केला. त्यानंतर विशाल याने संदिप गुंजाळ याला रविंद्र खोल्लम याच्या मदतीसाठी पाठविले होते. परंतू खोल्लमच्या घराजवळच मयत संजय कोतकर व संदिप गुंजाळ यांची गाठ पडली.

दरम्यान मंगळवारी (दि. २४) दुपारी पोलिसांनी विशाल कोतकर याला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती एस. एस. पाटील यांचेसमोर हजर केले. यावेळी सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील ॲड. सीमा देशपांडे यांनी युक्तीवाद केला की, विशाल कोतकर हा घटनेनंतर फरार होता. तो कोठे वास्तव्यास होता, याचा तपास करावयाचा आहे. 

तसेच हा कट कोठे करण्यात आला, त्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का? याचा तपास करावयाचा आहे. त्यासाठी विशाल कोतकरला पोलिस कोठडी मिळावी तसेच रवि खोल्लम याची पोलिस कोठडीची मुदत संपत असल्याने त्यालाही न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने कोतकर, खोल्लम यांना दि. २७ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.