केडगाव हत्याकांड प्रकरणाने कोतकर कुटुंब पुन्हा संकटात !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- केडगाव हत्याकांडातील आता थेट कोतकर कुटुंबीयांचे कनेक्शन पुढे आल्याने नवा ट्विस्ट आला आहे. पहाटे कामरगाव येथून पकडलेला नगरसेवक विशाल कोतकर व पोलिस कोठडी संपलेल्या रवि खोल्लम या दोघांना काल (दि. 24) दुपारी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सो. सु. पाटील यांच्यासमोर हजर करण्यात आले.

----------------------------
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा Ahmednagarlive24 App https://goo.gl/A1KePS 
-------------------------------
केडगाव दुहेरी हत्याकांडातील मुख्य सूत्रधार विशाल कोतकर याला अटक केल्यानंतर त्याने पोलिसांना खळबळजक माहिती दिली आहे. केडगाव दुहेरी हत्याकांड घडण्या आधी काँग्रेसचा उमेदवार विशाल कोतकर हा मनपाच्या पोटनिवडणुकीत विजयी झाला होता. तो विजयाचा जल्लोष साजरा करण्यासाठी भानुदास कोतकर यांच्या बंगल्यावर गेला होता. त्या ठिकाणी सुवर्णा कोतकर यांच्यासह अनेकांनी त्याचे स्वागत करत जल्लोष केला.

हत्याकांडापूर्वी मनपाच्या पोटनिवडणुकीत निवडून आलेला विशाल कोतकर हा चुलते भानुदास कोतकर यांच्या बंगल्यावर होता. या बंगल्यावर जाऊन आरोपी रवींद्र खोलमने मयत संजय कोतकरबरोबर मोबाइलवरून झालेल्या संभाषणाची माहिती सांगितली होती. ही माहिती माजी उपमहापौर सुवर्णा कोतकर व इतरांना सांगण्यात आली. 

त्याचवेळेस सुवर्णा यांनी आपले सासरे भानुदास कोतकर यांना फोन केल्याचे फोन कॉल डिटेल्सवरून तपासात उघडकीस आले आहे. त्यानुसार तपास करायचा असल्याचे तपासी अधिकारी दिलीप पवार यांनी विशाल कोतकर व खोलम याची पोलिस कोठडी मागताना न्यायालयात सांगितले. या हत्याकांडाबाबत भानुदास कोतकर यांच्या बंगलावर काय कट शिजला या दृष्टीने पोलिस तपास करणार आहेत.
लांडे खून प्रकरणात जामिनावर जिल्ह्याबाहेर वास्तव्य करणार्‍या भानुदास कोतकर याच्यासोबत सून सुवर्णा कोतकर यांचे काय संभाषण झाले, याचा तपास करायचा आहे. त्या कटात आणखी कोण-कोण सहभागी आहेत, याची चौकशी करायची आहे. गुंजाळ याने विशाल कोतकर याच्या सांगण्यावरून खून केल्याचे पोलिस कोठडीत असताना सांगितलेले आहे. 

त्यामुळे कोतकर याच्याकडे गुंजाळ याने दिलेल्या जबाबाबाबत चौकशी करायची आहे. आतापर्यंतच्या तपासानुसार विशाल कोतकर हा गुन्ह्याचा मुख्य आरोपी आहे. रवि खोल्लम याच्याशी मयताचे वाद झाल्यानंतर खून झालेला आहे. त्यामुळे विशाल कोतकर व रवि खोल्लम यांच्यात समोरासमोर तपास करायचा आहे. कोतकर याच्याकडून गुन्ह्यावेळी वापरलेला मोबाईल हस्तगत करायचा आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.