पेट्रोल, डिझेलचे दर पुन्हा भडकले !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :इंधनाची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दरवाढ झाल्याने पेट्रोल आणि डिझेलचे देशातील दरही भडकले असून मराठवाड्याची राजधानी औरंगाबादमध्ये पेट्रोल ८३.३३ रुपये प्रति लिटर, तर डिझेल ७१.०० रुपये प्रति लिटरवर पोहोचले असल्यामुळे या दरवाढीने मोठा फटका सहन करत असलेल्या वाहतूकदार संघटना आता आक्रमक झाल्या आहेत. ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसचे मल्कित सिंह यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

जीएसटीच्या कक्षेत इंधन दरांना आणावे आणि महाराष्ट्रासह काही राज्यांतील अतिरिक्त कर रद्द करुन ग्राहकांना दिलासा द्यावा, अशी मागणी केली जात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चार वर्षांपूर्वी इंधनाचे दर प्रतिबॅरल १०५ डॉलर होते. आता ते ७४ डॉलर आहेत. म्हणजेच चार वर्षांपूर्वीच्या तुलनेत कमीच आहेत. तरीही भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ झालेली दिसते. कच्च्या तेलाचे दर वाढले आहेतच, शिवाय राज्य सरकारचे विविध कर आणि केंद्र सरकारची एक्साईज ड्युटी यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर मोठ्या प्रमाणात भडकले आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.