उद्धव ठाकरे आज नगरमध्ये येणार


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आज नगरमध्ये येणार आहेत. केडगाव येथे घडलेल्या दुहेरी खून प्रकरणाच्या घटनेतील कोतकर व ठुबे परिवाराची ते भेट घेणार आहेत. त्यानंतर स्थानिक शिवसेना पदाधिकारी, नेते व कार्यकर्त्यांची बैठकही ते घेणार आहेत. 
केडगाव येथील शिवसैनिक संजय कोतकर व वसंत ठुबे यांची निर्घृण हत्या १५ दिवसांपूर्वी झाली आहे. या घटनेनंतर केडगावमध्ये दगडफेक झाली तसेच पोलिस अधीक्षक कार्यालयावर हल्ला होण्याचीही घटना घडली
या पार्श्वभूमीवर ठाकरे बुधवारी सकाळी ११ वाजता येथील पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर मुंबईहून हेलिकॉप्टरने येणार आहेत. 

त्यानंतर ते केडगाव येथे जाऊन कोतकर व ठुबे परिवाराला भेटणार आहेत. तेथून पुन्हा नगरमध्ये येणार असून, स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहेत. त्यांच्यासमवेत शिवसेनेचे गृहराज्य मंत्री दीपक केसरकर असणार आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.