नेवासेतील त्या महिलेचा खून अनैतिक संबंधातून.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नेवासे फाटा येथील सावतानगर येथील रहिवासी संगीता विलास शिंदे यांचा खून औरंगाबाद येथील वाळुंज परिसरात अनैतिक संबंधातूनच करण्यात आला असल्याचे निष्पन्न झाले आहे. १७ एप्रिलपासून शिंदे या बेपत्ता झाल्या होत्या.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
नेवासे पोलिस स्टेशन येथे मिसिंगची फिर्याद संगीता शिंदे यांचा मुलगा सागर शिंदे यांनी दिली होती. १७ एप्रिल रोजी रात्री ८ नंतर नजन हॉस्पिटलमधून बाहेर पडल्या होत्या. नेहमीप्रमाणे घरी जाण्यासाठी निघाल्या होत्या; मात्र, त्यानंतर त्या घरी परतल्या नसल्याचे लक्षात येताच शोधाशोध सुरू झाली. एमआयडीसी परिसरात जोगेश्वरी भागात एक्सलंट कंपनीच्या पाठीमागील बाजूस संगीता शिंदे यांचा मृतदेह आढळून आला होता. १८ एप्रिल रोजी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

जोगेश्वरी येथील कंपनीत मृतदेह पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने आणून टाकला असावा, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला. त्यांच्या गळ्यावर दोरीने किंवा वायरने आवळल्याच्या खुणा आढळल्या. वाळुंज पोलिसांनी गुप्त खबऱ्याच्या माहितीवरून सायबर क्राइमकडून सीडीआर घेऊन त्यामधील आलेल्या व केलेल्या कॉलचा अभ्यास केला असता त्यामधील एक अनोळखी मोबाइलधारक मृताच्या मोबाइलवर संपर्कात असल्याचे दिसले.

त्यावरून मोबाइलधारकचा पत्ता काढला असता तो क्रमांक शेख जावेद शेख बदरोद्दीन याच्या नावावर असल्याचे समजले. परंतु, तो खुनाच्या गुन्ह्यात हरसूल जेलमध्ये असल्याचे समजले. त्याचा नातेवाईक इम्रानखान इब्राहिम पठाण (वय २८, रा. जोगेश्वरी, ता. गंगापूर) हा त्याचा मोबाइल वापरत असल्याचे दिसून आले. 

त्यावरून इम्रानचा शोध घेऊन त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याची विचारपूस केली असता त्याने अनैतिक संबंधातून भांडण होऊन संगीता शिंदे यांचा गळा आवळून खून केल्याचे सांगितले. संगीता शिंदे व त्याची एक वर्षापासून ओळख असून १७ एप्रिल रोजी इम्रानखान हा नगरहून औरंगाबादकडे येत असताना औरंगाबादकडे येत असताना मृत संगीता शिंदे यांची नेवासा फाटा येथे भेट झाली. 

त्यांना गाडीत बसवून औरंगाबादकडे नेत असताना रस्त्यामध्ये त्यांचे पैशाच्या कारणावरून भांडण झाले. भांडणात शिंदे यांनी इम्रानखान यास शिवीगाळ केल्याने त्याचा राग येऊन त्याने दोरीने गळा आवळून खून करून मृतदेह जोगेश्वरी शिवारात फेकून दिल्याचे निष्पन्न झाले. 

पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक लक्ष्मण उंबरे यांनी तसेच पोलिस कर्मचारी यांनी तपास केला. आरोपीस पोलिसांनी अटक केली असून या गुन्ह्यात हा एकटाच होता की आणखी कोणी साथीदार होते, याचा शोध पोलिस घेत आहेत
-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.