भाजीपाल्याचे भाव कोसळल्यामुळे शेतकऱ्यांचा तोटा.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :दरवर्षी एप्रिल ते मे या कालावधीत पालेभाज्यांना चांगला भाव मिळत असल्याचा अनुभव आहे, पण यंदा एप्रिल सरत आला तरी समाधानकारक भाव नसल्याने शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागत आहे. उत्पन्नावर आधारित हमी भाव केवळ भाषणातच ऐकायला मिळत असल्याने शेतकऱ्यांना मोठी गुंतवणूक करूनही उत्पादन खर्च निघत नाही. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
जिल्हाभरात मागील पावसाळ्यात दमदार पाऊस झाल्याने विहिरी व इतर जलस्त्रोताच्यामाध्यमातून बहुतेक ठिकाणी शेती सिंचनासाठी पाणी उपलब्ध आहे. या जोरावर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पालेभाज्यांचे उत्पादन घेण्यावर भर दिला. पण पालेभाज्यांचे दर कोसळलेलेच आहेत. टोमॅटो विकावे की फेकावेत असा प्रश्न आता शेतकऱ्यांसमोर आहे. 

टोमॅटो मागील वर्षी वीस ते तीस रुपये किलोने विकला गेला होता. यंदा मात्र, बाजार समितीत टोमॅटोला पन्नास पैसे ते दोन रुपये प्रतिकिलोचा दर मिळत आहे. शेती मशागतीसह प्रत्यक्ष बाजार समितीपर्यंत शेतमाल वाहून आणण्यास प्रतिकिलो एक ते दीड रुपया खर्च येतो. पण बाजारभावच दीड ते दोन रुपये मिळत असल्याने शेतकऱ्यांना नफा तर दूरच पण तोटा सहन करावा लागत आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.