तडीपार गुंडासह सात आरोपी गजाआड

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :श्रीरामपूर पोलिसांनी रविवारी रात्री केलेल्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये तडीपार गुंडासह सात आरोपी पकडण्यात आले. दहा गावठी अड्ड्यांवर छापे टाकून सुमारे ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन सहा जणांना अटक करण्यात आली. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
अतिरिक्त पोलिस अधीक्षक रोहिदास पवार, उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संपत शिंदे, वसंत पथवे यांच्या पथकाने ही कारवाई केली. कारवाईत पोलिस उपनिरीक्षक श्रीराम शिंदे , प्रदीप शेवाळे, सतीश शिरसाठ यांच्यासह राज्य राखीव पोलीस दल व ५० पोलिस कर्मचाऱ्यांनी भाग घेतला. सुमारे २७ अजामीनपात्र गुन्ह्यांतील आरोपींना पकडण्यासाठी ही कारवाई करण्यात आली. 

अब्बास दगडूभाई बागवान, सत्तार गुलाब शेख, गोरख रघू परदेशी, राजू भिवा मोरे हे चौघे आरोपी सापडले. सागर श्रावण भोसले या तडीपार गुन्हेगाराला ताब्यात घेण्यात आले. प्रमोद भुजंग इकलीकर हा आरोपी संशयास्पदरित्या फिरताना आढळला. तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दत्तात्रय विठ्ठल गमे, अरुण रामदास गमे, ज्ञानेश्वर एकनाथ दरेकर, अरुण रामदास बोरुडे यांना अटक करण्यात आली. टाकळीभान येथे हातभट्टीवर छापा टाकून ८० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.