खासदार दिलीप गांधी यांनी केले नितीन गडकरींचे अभिनंदन

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नगर शहरात आगामी काळात होत असलेल्या ३.०८ किलोमीटर अंतराच्या २७८ कोटी खर्चासाठीच्या बहुचर्चित उड्डाणपुलाची निविदा प्रकाशित झाली. या निमित्ताने खासदार दिलीप गांधी यांनी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते विकास व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली व नगरच्या उड्डाणपुलाचा प्रश्न मार्गी लावल्यानिमित्त नगरवासियांच्या वतीने त्यांचे पुष्पगुच्छ देऊन आभार मानले. 
----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
तसेच अहमदनगर जिल्ह्याचा समावेश भारतमाला योजनेत केल्याने आता जिल्ह्यातून जाणारे सगळे रस्ते राष्ट्रीय महामार्ग होणार आहेत यासाठीही खासदार गांधी यांनी नितीन गडकरींचे आभार मानले.शहराचा झपाट्याने विकास होत असताना शहरार्तंगत तसेच शहराबाहेर रस्ते कमी पडत असल्याने शहरातील रस्त्यांवर वाढलेल्या लोकसंख्येचाही ताण पडत असल्याने नगरकरांसाठी वाहतूक कोंडी नेहमीच उद्भवत होती. 

तसेच शहरात होणारे अपघात कमी करण्यासाठी नगर शहरातून उड्डाणपुल होणे अत्यंत आवश्यक होते. नगर करांच्या या मागणीसाठीच केंद्रीय रस्ते विकास व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे उड्डाणपुलाचा प्रश्न अखेर मार्गी लागला असल्याचे मत खासदार दिलीप गांधी यांनी व्यक्त केले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
                                                      -------------------------------- 
Blogger द्वारा समर्थित.