पारनेरमध्ये विवाहितेवर चहामध्ये गुंगीचे औषध टाकुन बलात्कार

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-पारनेर तालुक्यातील कोहकडी येथील २८ वर्षीय विवाहित महिलेवर गेल्या ७ महिन्यापासून शिरुर येथील लाॅजवर व राहत्या घरी बळजबरीने बलात्कार केला असल्याची फिर्याद पारनेर पोलिस ठाण्यात पिडीत महिलेने दिली आहे.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
या सबंधीची पोलिस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की या घटनेतील आरोपी मच्छिंद्र ज्ञानदेव जाधव याने गेल्या वर्षी ऑक्टोबर २०१७ मध्ये तुझ्या पतीचा शिरुर बायपास येथे अपघात झाला आहे असे फोनवर खोटे सांगुन शिरुर येथे मला बोलावून घेतले.

त्यावेळी चहा पिण्याच्या सहाय्याने माझ्या चहामध्ये गुंगीचे औषध टाकुन शिरुर जि.पुणे येथील हाॅटेल जान्हवी लाॅजवर नेवुन तेथे माझे विवस्त्र फोटो काढले.तसेच शिरुर येथील हाॅटेल जान्हवी लाॅजिंग व राहत्या घरी या दोन्ही ठिकाणी मला आॅक्टोबर २०१७ ते २३ एप्रिल २०१८ या सात महिन्याच्या कालावधीत माझ्या इच्छेविरोधात आरोपींने बळजबरीने शरीर संभोग केला असल्याची फिर्याद या महिलेने दिली आहे.

तसेच या संदर्भात कुठेही वाच्यता केली तर तुझे विवस्त्र व अश्लील फोटो तुझ्या घरच्यांना दाखविल अशी धमकी देवुन अनेक वेळा बलात्कार केला असल्याची फिर्याद या पिडीत महिलेने दिली आहे.त्यानुसार या पिडीत महिलेच्या फिर्यादीवरून मच्छिंद्र ज्ञानदेव जाधव यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला असुन पोलिस त्याचा शोध घेत आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.