पोलिस अधीक्षक कार्यालयावर हल्ला प्रकरणी आ.शिवाजी कर्डिलेंना जामीन मंजूर

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :पोलिस अधीक्षक कार्यालयावर हल्ला प्रकरणातील भाजपचे आ. शिवाजी कर्डिले यांना अखेर आज सशर्त जामीन मंजूर केला आहे,आ.कर्डिले यांच्यासह पाच जणांच्या जामीन अर्जावर काल (दि. 23) दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाला होता. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश भिलारे यांच्यासमोर ही सुनावणी झाली. आ. कर्डिले यांच्यासह अ‍ॅड. प्रसन्न जोशी, अ‍ॅड. संजय वाल्हेकर, सागर वाव्हळ, अलका मुंदडा या पाच जणांनी जामिनासाठी जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज केला होता. आरोपींच्यावतीने युक्तिवाद करताना अ‍ॅड. नितीन गवारे म्हणाले की, पोलिस अधीक्षक कार्यालयावरील हल्ला प्रकरणात आरोपींविरुद्ध दाखल गुन्ह्यातील भारतीय दंड विधानाचे कलम 308 व कलम 225 हे चुकीच्या पद्धतीने नोंदविलेले आहे.

त्या गुन्ह्याची व्याख्या फिर्यादीत नमूद नसतानाही जाणूनबुजून ही कलमे वाढविण्यात आलेली आहेत. जमावाच्या हल्ल्यात पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या प्रवेशद्वाराची काच तुटलेली आहे. फिर्यादी पोलिस कर्मचार्‍याला झालेली जखम नेमकी कोणी केलेली आहे, हे स्पष्ट केलेले नाही. आ. कर्डिले यांना अटक करण्यात आलेली नाही, तर ते स्वतःहून पोलिस ठाण्यात हजर झालेले आहेत. त्यामुळे पाचही जणांना जामीन मंजूर करावा.
-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.