विखे पाटलांकडून जगताप-कोतकर-कर्डिलेंना गुन्ह्यातून वाचविण्याचा प्रयत्न !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :केडगाव येथील दुहेरी हत्याकांडात मरण पावलेल्या संजय कोतकर व वसंत ठुबे यांच्या परिवारातील सदस्यांनी विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे यांना आपल्या घरी येण्यास मनाई केली आहे. 'राज्याचे विरोधी पक्ष नेते केडगाव प्रकरणात एकाच बाजूवर बोलत असल्याने त्यांच्याकडून आमच्या दुःखावर मीठ चोळण्याचा प्रकार होत आहे, त्यामुळे त्यांनी आमच्या कुटुंबास भेटण्यासाठी येऊ नये', असे लेखी पत्र संजय कोतकर यांचे चिरंजीव संग्राम कोतकर व वसंत ठुबे यांचे बंधू प्रमोद ठुबे यांनी विखेंना पाठवले आहे.

----------------------------
ब्रेकिंग न्यूजसाठी डाऊनलोड करा Ahmednagarlive24 App https://goo.gl/A1KePS 
-------------------------------
संग्राम कोतकर व प्रमोद ठुबे यांनी पाठवलेल्या या पत्रात विखेंवर टीका केली आहे. 'केडगाव येथील दुहेरी खुनाचा गुन्हा दाखल झाल्यापासून टीव्ही चॅनेल व पत्रकार परिषदांतून हे दुहेरी हत्याकांड वैयक्तिक वादातून झाल्याबाबतचा जावईशोध विखे यांनी लावला व वेगवेगळी वक्तव्ये करून तपासात अडथळा होईल, असे कृत्य केले आहे.

राज्याचे विरोधी पक्ष नेते असतानाही जगताप-कोतकर-कर्डिलेंना गुन्ह्यातून वाचविण्याचा प्रयत्न करीत आहात तसेच मयत व मयताच्या कुटुंबाबद्दल अनादर व्यक्त करीत आहात', असा दावा या पत्रात केला गेला आहे. याशिवाय, विखे कुटुंब व काँग्रेस पक्षाने केडगावच्या कोतकर परिवाराबद्दल केलेले भाष्य, त्याच्या वृत्तपत्रांतून आलेल्या बातम्यांची कात्रणे, केडगावच्या पोटनिवडणुकीत डॉ. सुजय विखे यांनी केलेला प्रचार आदींसह अन्य विविध अनुषंगिक मुद्यांवर या पत्रात भाष्य करण्यात आले आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.