नव्या जिल्ह्याचे मुख्यालय संगमनेर व्हावे.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नगर जिल्ह्याच्या विभाजनात संगमनेर हाच नव्या जिल्ह्याचे मुख्यालय व्हावे, अशी मागणी अकोले तालुका माजी सैनिक संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. तशा मागणीचे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आले आहे.
----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
अकोले, संगमनेर तालुक्‍यात माजी सैनिकांची संख्या जास्त आहे. अकोले तालुका हा दुर्गम आणि डोंगराळ तालुका म्हणून ओळखला जातो. संगमनेर तालुक्‍याचाही बराच भाग आदिवासी व पठार भाग आहे. या दुर्गम तालुक्‍यात माजी सैनिकांची संख्या जास्त आहे. 

अकोले व संगमनेर तालुक्‍यातील दुर्गम भागातील आदिवासी बांधव असलेल्या माजी सैनिकांना नगर तसेच इतर दूरच्या ठिकाणी सेवानिवृत्तीच्या कामानिमित्त जाणे वार्धक्‍यामुळे शक्‍य होत नाही. तसेच, विधवा पत्नी यांनाही इतर जिल्हा ठिकाण दूर पडते, मोठे हाल होतात. 

संगमनेर जिल्हा झाला तर मोठ्या प्रमाणावर माजी सैनिक असलेल्या अकोले व संगमनेर तालुक्‍यातील माजी सैनिकांना सोईचे होईल. माजी सैनिक बोर्डाचे जिल्हा कार्यालय जवळ येईल. तसेच, इतरही प्रश्‍न सोपे होतील. तरी नगर विभाजनात संगमनेर जिल्हा होण्यासाठी आमच्या मागणीचा विचार व्हावा, अशी मागणी केली आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.