कोपरगावात महाविद्यालयीन तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या तरुणाने घरातील पंख्याच्या हुकला दोरी लावून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी रात्री आठच्या सुमारास येथे घडली. शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
मनोज बाबासाहेब तुपे (वय 20, रा. धांदलगाव, ता. वैजापूर, जि. औरंगाबाद) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.मनोज हा संजीवनी अभियांत्रिकीचा विद्यार्थी होता. शहरातील बागूल वस्ती येथे अजित सुरेश कोरके यांच्या खोलीमध्ये तो राहत होता. त्याचे चार मित्रही त्या खोलीमध्ये राहत होते. 

त्याने रविवारी रात्री आठच्या सुमारास घरी कोणी नसताना राहत्या खोलीतील आतली कडी लावून पंख्याच्या हुकला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मनोजच्या आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.