खासदार सदाशिव लोखंडे सह शिवसैनिकांनी फोडला टोलनाका !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :श्रीरामपूर पासिंगच्या (एम. एच. 17) चारचाकी वाहनांना संगमनेरमधील हिवरगाव पावसा येथील टोलनाक्‍यावर टोलमाफी देण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी शिवसेनेने सोमवारी आंदोलन केले. यावेळी टोलनाक्‍याच्या केबीनच्या काचा व सुरक्षिततेसाठी लावलेल्या बॅरिकेटस्‌ तोडण्यात आल्या. खासदार सदाशिव लोखंडे, जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांच्यासह उत्तर नगर जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक यावेळी उपस्थित होते.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
हिवरगाव पावसा येथील टोलनाक्‍यावर वाहनांना नाशिकच्या धर्तीवर टोलमाफी दिली जावी, स्थानिकांना रोजगार द्यावा, भुयारी पुल आणि सर्व्हीस रस्त्याचे काम पूर्ण करणे, साइड गटारी आणि स्ट्रीट लाइटची कामे करणे, पादचारी क्रॉसींग पूल बांधणे, शेतकऱ्यांच्या भाजीपाला व इतर मालवाहतूक करणाऱ्या मालगाड्यांना टोलमाफी मिळावी आदी मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. 

आंदोलकांनी दोन तास केलेल्या आंदोलनादरम्यान टोल प्रशासनाला धारेधर धरले होते. तालुकाप्रमुख जनार्दन आहेर, शहरप्रमुख अमर कतारी, माजी शहरप्रमुख आप्पा केसेकर, सोमनाथ कानकाटे, अशोक सातपुते आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांचा यात समावेश होता.

गेल्याच आठवड्यात जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांनी टोल प्रशासनाला आंदोलनाचा इशारा दिला होता. प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही, त्यामुळे सोमवारी आंदोलन करण्यात आले. अकरा वाजता जमलेल्या शिवसैनिकांनी ठिय्या देत आंदोलन केले. यादरम्यान दोन्ही बाजूकडील वाहनांकडून टोल आकारणी केली गेली नाही.याच दरम्यान आंदोलनातील काही कार्यकर्त्यांकडून टोल नाक्‍याच्या मालमत्तेला नुकसान पोहचले गेले. केबीनच्या काचा आणि बॅरिकेटस्‌ तोडण्यात आले. त्यामुळे काही काळ वातावरणात तणाव निर्माण झाला होता.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.