बाळासाहेब पवार आत्महत्या प्रकरणात पोलिसांची भूमिका संशयास्पद

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :ओम उद्योग समुहाचे संचालक बाळासाहेब पवार आत्महत्याप्रकरणी पवार यांच्या सलग्न असलेल्या 8 जणांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत.प्रसिध्द उद्योगपती बाळासाहेब पवार यांच्या आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या स्टँम्पपेपरवर संशयास्पद सहा नावे होती. तरीदेखील कोतवाली पोलिसांत फक्त आकस्मात मृत्यूची नोंद होती. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
पोलिसांकडून मृत्यूनंतर तपास करण्याऐवजी पवार यांच्या कुटुंबियांकडून गुन्हा दाखल होण्याची वाट पाहत होते. दरम्यान गुन्हा दाखल झाल्यानंतरच तपास सुरू होईल, अशी उत्तरेही काही अधिकारी देत. मृत्यूनंतर 15 दिवसांनी पवार यांची मुलगी अमृता यांनी गुन्हा दाखल केला. परंतु पोलिसांची भूमिका संशयास्पद असून अटक केलेला नवनाथ वाघ याच्याकडून गुन्ह्यासंदर्भात अपेक्षित माहिती मिळवता आली नाही.

त्यातच अद्याप तीन आरोपींना अटक करण्यात पोलिसांना अपयश आले आहे. गुन्हा दाखल होण्याची वाट पाहणार्‍या पोलिसांकडून गुन्ह्यासंदर्भातील नावे दडवून ठेवण्याचा प्रकार सुरू आहे. गुन्ह्याचा तपास पारदर्शी होईल का? असाच सवाल ग्रामस्थांमधून उपस्थित होत आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.