डॉ.सुजय विखेंच्या आरोग्य शिबिरापेक्षा राजकीय शेरेबाजीचीच जास्त चर्चा !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :आरोग्य विषयी बोलण्यापेक्षा राजकीय नेत्यांचे राजकारणाविषयी बोलू काही असाच कार्यक्रम होत असल्याचे दिसत आहे. दक्षिण नगर जिल्ह्यात डॉ.सुजय विखे यांनी आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन संपर्क सुरु केल्याचे लपून राहिले नसतानाच, त्यांचे कार्यक्रमांना सध्या तरी सर्वपक्षीय कार्यकर्ते हजेरी लावत आहेत. 


तालुक्यातील काष्टी येथील जनता विद्यालयात दि.२१ रोजी विखे मेमोरियल हॉस्पिटल यांच्या वतीने मोफत सर्व रोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन केले होते. त्यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भगवानराव पाचपुते होते. तर व्यासपीठावर माजी मंत्री व भाजप नेते बबनराव पाचपुते,नागवडे कारखाना अध्यक्ष रा news-2301 जेंद्र नागवडे, काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष अण्णासाहेब शेलार, बाळासाहेब गिरमकर, नागवडे कारखाना उपाध्यक्ष केशव मगर,कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रशांत दरेकर, सचिन कोकाटे, हेमंत ओगले,अरुणराव पाचपुते यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते. 

सुजय विखे म्हणाले व्यासपीठावर काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना यांच्या सह अनेक पक्षाचे दिग्गंज नेते हजर आहेत. त्यामुळे तालुका भाग्यवान आहे. पण विकासकामात एकत्र येत नाहीत. म्हणून अडचणी येतात. म्हणून राजकारण सुसंस्कृत होण्याची गरज आहे. 

बबनराव पाचपुते म्हणाले कि शिबीर घेतली तरी , निवडणूकित लोक काय नियोजन हे विचारतात म्हणून तुम्ही जवळ आलेल्या स्वार्थी लोकांपासुन सावध रहा पण मी म्हणेल माझ्या पासुन सर्वानी सावध रहावे कारण मी कधी गायब होईल सागता येत नाही मी अपक्ष आहे.आरोग्य योजनेत राजकारण न करता फायदा घ्या असे विखे म्हणाले.

प्रथम आण्णासाहेब शेलार भाषण करताना म्हणाले, तालुक्यात दादा नावाची माणसच मोठी झाली. पण अण्णा, बापु,तात्या,नाना,हे मागे राहिली म्हणून सुजयराव आम्हाला कुठे तरी जागा द्या. आणि तुम्ही मेंदू सर्जन आहात तर ज्याचा मेंदू तालुक्यात सरकलाय त्याच्यावर उपचार शोधा,राजेंद्र नागवडे म्हणाले आण्णासाहेब तुम्हाला पक्षाने जिल्हा अध्यक्षपद दिले आणि दोन वेळा जि.प.चे उपाध्यक्ष केले तरी तुम्ही समाधानी नाही तुम्हाला कोणता राजकीय आजार झालाय ते सांगा, विखे योग्य उपचार करतील . 

यावर सुजय यांनी उपचार करताना सांगितले मी सावध राहण्यापेक्षा माझ्या पासुन सर्वानी सावध राहाव. कारण याचा अनुभव उत्तरेतील जनतेला माहिती आहे. आज कोणाला आजार नाही म्हणून एकाच व्यासपीठावर आलेले दिसतात. पण काही दिवसांनी निवडणूका लागतील त्यावेळी समजेल कोणाला कोणता आजार आहे. मग तेथे मात्र डॉक्टर वेगवेगळी दिसतील हे लवकरच कळेल. 

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.