आ.वैभव पिचडांसह ५ आमदारांवर हल्ल्याच्या तयारीत असणाऱ्या नक्षलवाद्यांचा खात्मा.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :गेल्या 38 वर्षातली सर्वात मोठी कारवाई करत पोलिसांनी गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड भागात सी-60 या नक्षलवादी विरोधी पथकाने 13 नक्षलवाद्याना कंठस्नान घातलं. गडचिरोली जिल्ह्यातील आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई आहे. मात्र, या नक्षलवाद्यांच्या रडारवर अनुसूचित जमाती कल्याण समितीतील आमदार होते, अशी खळबळजनक माहिती शहापूरचे आमदार आणि समितीचे सदस्य पांडुरंग बरोरा यांनी दिली.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
अनुसूचित जमाती कल्याण समितीच्या आमदारांना लक्ष्य करण्यासाठी नक्षलवादी येणार होते, अशी गुप्त माहिती पोलिसांना होती. याच भामरागड नक्षली भागाच्या दौऱ्यात ठाणे जिल्ह्यातील शहापूर विधानसभेचे आमदार पांडुरंग बरोरा, नगर जिल्ह्यातील अकोले विधानसभेचे आमदार वैभव पिचड, पालघर येथील विधानपरिषद आमदार आनंद ठाकूर, भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे आणि पालघर जिल्ह्यात डहाणू विधानसभेचे आमदार अमित घोडा हे होते.

या परिसरात वाहनाने जाण्यासाठी आमदारांच्या समिती सदस्यांना पोलीसांनी मनाई केली होती. मात्र, या परिसरातील आदिवासींचे जीवनमान, त्यांना मिळणाऱ्या शासकीय योजना यांची पाहणी करण्यासाठी समिती सदस्यांनी आग्रह धरला.या ठिकाणी जाण्यासाठी खास हेलिकॉप्टर मागावून अहेरी ते भामरागड प्रवास केला. मात्र, या समिती दौऱ्याला लक्ष्य करण्यासाठी नक्षलवादी नजर ठेवून होते. त्या नक्षलवाद्यांवर गडचिरोलीतील सी-60 नक्षलवादी विरोधी पथकाची नजर होती. संधी मिळताच पहाटेच्या सुमारास 13 नक्षलवाद्यांचा खात्मा करून आजपर्यंतची सर्वात मोठी नक्षलविरोधी कारवाई पोलिसांनी केली.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.