श्रीरामपूर-संगमनेर रस्त्यावर उसाचा ट्रक कारवर उलटला ,एक ठार

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :उसाने भरलेला मालट्रक कारवर उलटून झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाला. ही घटना श्रीरामपूर-संगमनेर रस्त्यावर नांदूर फाटा येथे रविवारी दुपारी एकच्या सुमारास घडली. अन्सार महंमद कासम पटेल (५४) असे मृताचे नाव आहे. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
पटेल हे मुंबई येथे नगररचना विभागात कार्यरत होते. रविवारी दुपारी घरी येण्यास निघाले असता नांदूर फाट्यानजिक संगमनेरच्या दिशेने जाणारा उसाने भरलेला मालट्रक (एमएच २८ बी ६५३५) त्यांच्या कारवर उलटला झाला. यात पटेल यांची हुन्डाई आय ट्वेन्टी (एमएच १७ बीजे ९११९) ही कार चक्काचूर झाली. अपघाताचे वृत्त समजताच शहरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. 

पटेल यांना तत्काळ येथील संजीवन रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. येथील व्यावसायिक अल्तमेश यांचे ते वडील, तर नगरसेविका अक्सा पटेल यांचे ते सासरे होत. त्यांच्यावर हसनापूर (तालुका राहाता) या त्यांच्या मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.