नगरकरांचा जिव्हाळ्याचा विषय असलेल्या उड्डाणपुलाचा प्रश्‍न मार्गी !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नगरकरांचा जिव्हाळ्याचा विषय असलेल्या उड्डाणपुलाचा प्रश्‍न अखेर मार्गी लागला आहे. त्यामुळे उड्डाणपुलाबाबत होणार्‍या उलट-सुलट चर्चांनाही अखेर पूर्णविराम मिळाला आहे. मागील ८-१० वर्षांपासून होणार-होणार म्हणून गाजत असलेला नगरचा उड्डाण पूल अखेर मार्गी लागण्याची चिन्हे आहेत. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने या पुलाचे टेंडर प्रसिद्ध केले आहे. यानुसार नगर-पुणे रोडवरील सक्कर चौक ते स्टेट बँक चौक या दरम्यान तीन किलोमीटर अंतराच्या चार पदरी उड्डाण पुलासाठी २७८ कोटी ६२ लाख रुपये खर्च निश्चिती करण्यात आली आहे. ५ जूनपर्यंत या कामाचे टेंडर भरण्याची मुदत असून, येत्या दोन वर्षात या पुलाचे काम करण्याचे बंधन आहे.
-------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
---------------------------
औरंगाबाद, पुणे, मनमाड, सोलापूर, जामखेड व पाथर्डी असे सहा राज्य मार्ग नगर शहराच्या मध्यवस्तीतील नगर-पुणे रस्त्याने (स्टेशन रोड) जातात. पुण्या-मुंबईहून विदर्भ-मराठवाड्याकडे जाण्यासाठी याच रस्त्याचा वापर होतो. शिवाय स्थानिक वाहतूकही या रस्त्यावर जादा असते. दोन बसस्थानके, जिल्हा परिषद, मार्केट यार्ड, जिल्हा बँकेसह हॉटेल्स-हॉस्पिटल्ससारखी गर्दीची ठिकाणेही याच रस्त्यावर आहेत. त्यामुळे या रस्त्यावर वाहतूक कोंडी व छोटे-मोठे अपघात नित्याचे झाले आहे. 

त्यामुळे या रस्त्यावर उड्डाण पुलाची गरज होती. पण मागील ८-१० वर्षांत या पुलाचे दोनदा भूमिपूजन होऊनही प्रत्यक्ष काम मात्र सुरू झाले नाही. य़ा पार्श्वभूमीवर आता केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने या पुलाच्या कामाचे टेंडरच प्रसिद्ध केल्याने हा पुल नक्की होणार, याची खात्री दिसू लागली आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.