जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळाला 871.44 कोटी रुपये कर्जमाफीचा लाभ

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत आतापर्यंत जिल्ह्यातील 2 लाख, 47 हजार 462 शेतकऱ्यांना 871 कोटी 44 लाख रुपयांचा लाभ मिळाला आहे. या योजनेत यापूर्वीच्या कालावधीत अर्ज करण्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्याची मुदत दिनांक 1 मे, 2018 पर्यंत वाढवण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी या वाढील कालावधीचा लाभ घेऊन ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले आहे. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
राज्य शासनाच्या या योजनेत सहभागी असलेल्या जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ निश्चितपणे मिळेल, असे त्यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यात अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत पात्र 210395 लाभार्थ्यांना रक्कम रुपये 614.23 आणि व्यापारी, ग्रामीण व खाजगी बँकामार्फत पात्र 37061 लाभार्थ्यांना रक्कम रुपये 257.21 असा एकूण 247462 लाभार्थ्यांना रक्कम रुपये 871.44 कोटी कर्जमाफीचा लाभ देण्यात आला आहे. 

राज्य शासनाने ही योजना जाहीर केल्यानंतर सुरुवातीच्या टप्प्यात जिल्ह्यामध्ये दि. 24 जुलै 2017 ते 22 सप्टेंबर 2017 अखेर एकूण 3 लाख 34 हजार, 920 ऑनलाईन अर्ज आपले सरकार पोर्टलवर अपलोड करण्यात आले. त्यापैकी आधार कार्ड संलग्नित ऑनलाईन अर्ज अपलोड केलेल्या शेतकऱ्यांची संख्या 3 लाख 15 हजार, 100 तर आधार कार्ड शिवाय अर्ज अपलोड करणारांची संख्या 19 हजार 820 इतकी होती. याशिवाय, ग्रीन यादी प्राप्त झाल्यानुसार संबंधित लाभार्थ्यांना कर्जमाफी रक्कम वर्ग कऱण्यात आली. 

त्यात, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेकडील या यादीत असणाऱ्या 2 लाख, 69 हजार, 946 लाभार्थ्यांना 882.17 कोटी आणि व्यापारी बॅंकेतील 57 हजार 221 लाभार्थ्यांना 414.53 कोटी रुपये मिळणार आहे. सध्या जिल्हा बॅंकेला त्यापैकी 614.23 कोटी इतकी रक्कम प्राप्त झाली असून या संपूर्ण रकमेचे वितरण 2 लाख 10 हजार 395 लाभार्थ्यांना करण्यात आले आहे. व्यापारी बॅंकेस प्रत्यक्ष प्राप्त झालेल्या 414 कोटी 53 लाख रकमेपैकी 37 हजार 61 लाभार्थ्यांना 257 कोटी 21 लाख रुपयांचे वितरण करण्यात आले आहे. उर्वरित रक्कम संबंधितांच्या खात्यावर तात्काळ वर्ग करण्याचे निर्देश संबंधित बॅंकांना देण्यात आले आहेत. 
-------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
---------------------------
या कर्जमाफी योजनेत राज्य शासनाने जाहीर केलेल्या दीड लाख रुपयांच्या आतील थकबाकी तसेच पुनर्गठण, प्रोत्साहनपर आणि एकरकमी परतफेड योजनेत सहभागी लाभार्थ्यांना त्यांच्या बॅंक खात्यावर थेट लाभ देण्यात आला आहे. रुपये दीड लाखाच्या आतील तसेच पुनर्गठण झालेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेतील लाभार्थी संख्या 84 हजार 608 तर रक्कम 402 कोटी 49 लाख, प्रोत्साहनपर योजनेत संख्या 1 लाख 21 हजार 959 तर रक्कम 169 कोटी 40 लाख, आणि एकरकमी परतफेड योजनेत लाभार्थी संख्या 3 हजार 838 व रक्कम 42 कोटी 32 लाख असे एकूण लाभार्थी संख्या 2 लाख 10 हजार 395 आणि रक्कम 614 कोटी 23 लाख इतकी आहे. रुपये दीड लाखाच्या आतील तसेच पुनर्गठण झालेल्या व्यापारी बॅंकांतील लाभार्थी संख्या 19 हजार 467 तर रक्कम 141 कोटी 45 लाख, प्रोत्साहनपर योजनेत संख्या 12 हजार 4 तर रक्कम 26 कोटी 79 लाख आणि एकरकमी परतफेड योजनेत लाभार्थी संख्या 5 हजार 590 व रक्कम 88 कोटी 97 लाख असे एकूण लाभार्थी संख्या 37 हजार 61 आणि रक्कम 257 कोटी 21 लाख इतकी आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.