माजीमंत्री पाचपुतेंमुळे 'कुकडी'चे आवर्तन पूर्ववत

अहमदनगर लाईव्ह24.कॉम : माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी पालकमंत्री व जलसंपदामंत्र्यांकडे पाठपुरावा केल्याने कुकडीचे आवर्तन रविवारी पूर्ववत चालू ठेवण्यात आले.आवर्तन २५ फेब्रुवारीपासून सुरू होते. श्रीगोंदे हद्दीत २३ ते ३१ मार्चदरम्यान पाणी चालू झाले. परंतु चारी सुटल्याने आवर्तनात विस्कळितपणा आला.गेज मिळत नसल्याने सर्व वितरिकांना पाणी मिळालेले नाही. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
प्रामुख्याने डीवाय १०, १३, १४,९,१५३, कापसेवस्ती बंधारा, घोडेगाव तलाव, लेंडीनाला तर अक्षरश कोरडा ठाक राहिला. म्हणून लाभधारक शेतकऱ्यांनी कुकडी कार्यालयात बैठक लावली. त्यावेळी अधिकाऱ्यांनीही वस्तुस्थिती सांगितली की, चालू आवर्तन पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी पाचपुतेंकडे पाठपुरावा केला.
-------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
---------------------------
पाचपुते यांनी पालकमंत्री राम शिंदे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याशी फोनवरून चर्चा केली. कुकडी प्रकल्पात १३ टीएमसी पाणी उपलब्ध आहे, ज्यातून अजून दोन रोटेशन होऊ शकतात. चालू आवर्तनात पाणी मिळाले नाही, तर पुढच्या आवर्तनांचा फायदा होणार नाही. त्यामुळे चालू आवर्तनात चार दिवसांची वाढ करून हक्काचे पाणी मिळणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले. दोन्ही मंत्र्यांनी हे म्हणणे मान्य करून रविवारी दुपारी १२ पासून आवर्तन पूर्ववत सुरु केले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.