रवी खोल्लमला अटक केल्यानंतर शिवसेनेचे ‘कटाचे’ बिंग उघड !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :शिवसेने विरोधात काम केल्याने रवी खोलम या काँग्रेस कार्यकर्त्यांचा ‘काटा’ काढण्यासाठी तावातावाने निघाला. खोल्लमच्या बचावासाठी संदीप गुंजाळ साथीदारांसह गेला. वाटेतच शिवसेनेच्या संजय कोतकर-वसंत ठुबे यांच्याशी त्यांची गाठ पडली. धमकीच जाब विचारण्याच्या कारणावरून एकमेकांत झंगडपक्कड झाली. त्यात कोतकरने गुंजाळच्या कानफडात लावली. त्यामुळे गुंजाळची सटकल्याने त्याने कट्ट्यातून कोतकरवर फायर केला. हा ‘गेम’ पाहून जीवाच्या भितीने पळणार्या वसंत ठुबे या दुसर्या शिवसैनिकावरही गोळ्या झाडत त्यालाही कायमचे संपविले.


----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
अटकेतील रवी खोल्लम याने तोंड उघडत हत्याकांडाचे रहस्य पोलिसांसमोर उलगडले आहे. संजय कोतकर व वसंत ठुबे हे दोघे केडगावात शिवसेनेचे पदाधिकारी होते. केडगाव पोटनिडणुकीच्या निकालादिवशी 7 एप्रिल रोजी त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हत्येला शिवसेनेने राजकीय रंग देत राष्ट्रवादीला आरोपीच्या पिंजर्यात उभे केले. त्यासाठी शिवसेनेने केडगावात घटनेनंतर मोठा हंगामा केला. मात्र रवी खोल्लम याला अटक केल्यानंतर शिवसेनेचे ‘कटाचे’ बिंग फुटू पाहत आहे.

रवी खोल्लम हा शाहुनगर येथे राहतो. तेथे शिवसेना उमेदवाराला कमी मतदान पडले आहे. काँग्रेस उमेदवाराने तेथे आघाडी घेतली. या भागात ‘तडजोड’ करण्याचे काम खोल्लमने केले होते. मतदारांशी ‘तडजोड’ करू नको अशी ताकीद शिवसेनेचे संजय कोतकर याने खोल्लमला दिली होती. मात्र खोल्लमने त्याचे एकले नाही. त्यामुळेच शिवसेनेच्या उमेदवारास पराभव पत्कारावा लागला. याचा राग संजय कोतकरला होता. त्याच रागातून संजय कोतकर व वसंत ठुबे हा दुपारीच ‘बसले’ होते.

तेथूनच खोल्लम याला संजय कोतकरने फोनवरून धमकी दिली होती. ‘तुला जास्त झाले आहे का, घरी थांब, तुझा काटा काढायला येतो’ असे म्हणून कोतकर व ठुबे दोघेजण खोल्लमच्या घराकडे निघाले. कोतकरने धमकी दिल्याची बाब रवी खोल्लमने काँग्रेसचे विजयी उमेदवार विशाल कोतकरला सांगितली. उगाज वाद नको म्हणून विशालने खोल्लमला घर सोडण्याचा सल्ला दिला.याच दरम्यान खोल्लमला मारहाण होऊ नये, याची खबरदारी म्हणून विशालने संदीप गुंजाळला पहिला फोन केला. संजय व वसंत हे दोघे खोल्लमला मारण्यासाठी त्याच्या घरी जात आहे. त्याच्या संरक्षणासाठी जा, तो घरी नसेेल तर त्याच्या कुटुंबियांच्या जीवला धोका आहे, असा निरोप मिळताच गुंजाळ हत्यारासह खोल्लमच्या घरी काही क्षणात पोहचला.
-------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
---------------------------
त्याने दारावर दस्तक दिल्यानंतर दरवाजा रवी खोल्लमच्या वडीलांनी उघडला. रवी कोठे आहे? अशी विचारणा गुंजाळने केली असता ‘तो नुकताच बाहेर गेला’ असे उत्तर मिळाले. तेथून गुंजाळ काही अंतरावर गेला असता त्याला संदीप गिर्हे व पप्पू मोकळ भेटले. सुवर्णनगर येथे संजय कोतकर व संदीप गुंजाळ यांच्यात बाचाबाची झाली. कोतकर यांनी संदीप गुंजाळच्या कानफडात लावल्यामुळे वाद टाकाला गेला व हे हत्याकांड घडले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.