विशाल कोतकरच्या अटकेकडे नगरकरांचे लक्ष


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :केडगाव दुहेरी हत्याकांड हे पोटनिवडणुकीत निवडून आलेला विशाल कोतकर याच्याबरोबर झालेल्या संभाषणानंतरच घडल्याचे या घटनेत तपासात समोर येत आहे. त्यामुळे विशाल कोतकर यानेच आरोपी संदीप गुंजाळ, संदीप गिर्‍हे व पप्पू मोकळे यांना खोलमच्या मदतीला पाठविले होते. यामुळे या गुन्ह्यातील मुख्यसूत्रधार, कट रचणारे याचा उलगडा फरार आरोपी विशाल कोतकर हा करू शकतो. यामुळे त्याच्या मागावर पोलिसांनी मोर्चा वळविला असून त्याच्या अटकेकडे नगरकरांचे लक्ष लागले आहे. 

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.