केडगाव हत्याकांडाचे रहस्य उलगडले !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :केडगाव येथील मनापाच्या पोटनिवडणुकीत दोघांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. त्याचे कारण अद्याप गुलदस्त्यात होते. मात्र रवी खोल्लम यास पोलिसांनी अटक केली असता त्याच्याकडून घटनेचा उलगडा झाला आहे.


----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
या पोटनिवडणुकीत कॉंग्रेसने शाहूनगरमध्ये आघाडी घेतली होती, तर शिवसेनेला कमी मतदान पडले होते. या भागात ‘अर्थ’पूर्ण तडजोड करण्याचे काम खोलमकडे होते. याबाबत शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी खोलम याला मतदारांना पैसे वाटप करुन नकोस अशी ताकीद दिली होती. मात्र तरीदेखील ‘अर्थ’पूर्ण राजकारण घडले.

यामुळे शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव झाला, अशी समजून रागातून शिवसेनेचे उपशहरप्रमुख संजय कोतकरने रवींद्र खोलमला धमकी दिली. हा वाद टोकाला गेल्यामुळे हे हत्याकांड घडल्याची माहिती खोल्लमने पोलिसांना दिली आहे.
-------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
---------------------------
संजय कोतकरने धमकी दिल्याने विशाल कोतकर यांना कळविले. त्यानंतर विशाल कोतकर यांनी संदीप गुंजाळ याला मदतीसाठी पाठविले. संजय कोतकर व संदीप गुंजाळ यांच्यात बाचाबाची झाली. यामध्ये संजय कोतकर यांनी संदीप गुंजाळच्या मुखात भडकावली. हा वाद विकोपाला गेला अन् हे दुहेरी हत्याकांड घडले. केडगाव दुहेरी हत्याकांड हे मनपा पोटनिवडणुकीतील वादातून घडल्याचे समोर आले आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.