नगराध्यक्ष राऊत यांची विधानसभेची तयारी, पालकमंत्री शिंदेवर मात करण्याचा प्रयत्न.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- कर्जतमध्ये छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा मोठ्या थाटामाटात पार पडल्या. या मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी व जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांनी आपले राजकीय वजन वापरून ही स्पर्धा प्रथमच ग्रामीण भागात आयोजित केली. शिंदे यांनी मोठा निधी उपलब्ध केला. मात्र, शिंदे यांच्यापेक्षा स्थानिक भाजप नेत्यांनी आपले ब्रँडिंग कसे करता येईल, याकडे विशेष लक्ष दिले. नगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त नगरसेवक आणि कार्यकर्त्यांसह मोठे शक्तिप्रदर्शन करत विधानसभेची पूर्वतयारी केली. या दोन्ही नेत्यांनी आपले राजकीय वजन आणि दबाव कर्जत-जामखेड मतदारसंघावर कसा राहील, याची पुरेपूर दक्षता घेतली. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
मंत्री शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे दिमाखदार आयोजन केले. श्रीसंत गोदड महाराज क्रीडानगरीत झालेल्या स्पर्धेसाठी शिंदे यांनी आपल्या खात्यामार्फत आणि राजकीय वजन वापरत मोठा निधी उपलब्ध केला. या स्पर्धेसाठी शिंदे कर्जत शहरात तळ ठोकून होते. याकामी त्यांनी स्थानिक भाजप आणि सर्वपक्षीय नेत्यांची चांगली मूठ बांधली होती. शिंदे यांच्या चेल्यांनी आपल्या नावाचे ब्रँडिंग या स्पर्धेच्या निमित्ताने करून घेतले. उदघाट्न समारंभाला मंत्री विनोद तावडे यांच्या अनुपस्थितीमुळे शिंदे यांच्या मंत्रिमंडळातील राजकीय वजनाची चर्चा स्थानिक नेत्यांनी दबक्या आवाजात केली होती. 

                                     

या सर्व घडामोडी शिंदे यांच्या कानावर जात होत्या. मात्र, त्यांनी संयम ठेवत आपल्या वाढदिवशी आणि कबड्डी स्पर्धेच्या समारोपाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणत सर्वांच्या तोंडाला लगाम लावला. अध्यक्षीय भाषणात त्यांनी उपस्थित केलेल्या तिन्ही मुद्द्यांवर मुख्यमंत्र्यानी सकारात्मक दृष्टिकोन दिल्याने आपण मुख्यमंत्र्यांच्या किती विश्वासातील आहोत, याची जाणीव शिंदे यांनी उपस्थितांना करून दिली. मुख्यमंत्री शिंदे यांचा उल्लेख रामभाऊ असा करत असल्याने त्या दोघांची जवळीक किती आहे याचे दर्शन कर्जतकरांना झाले. जे नेते आपले ब्रँडिंग करण्यात मश्गूल होते, त्यांची हवा शिंदे यांनी समारोपप्रसंगी काढली. याची चर्चा मुख्यमंत्री गेल्यानंतर चांगलीच रंगली. 

मुख्यमंत्र्यांच्या स्वागतप्रसंगी नगराध्यक्ष राऊत यांनी मनोगत व्यक्त करताना कर्जतच्या क्रीडा अकादमीसाठी ५ कोटींची मागणी केली. अध्यक्षीय भाषणात शिंदे यांनी क्रीडा अकादमीसाठी १० कोटींची मागणी करत आपण कधी शब्द टाकला आणि मुख्यमंत्र्यांनी तो टाळला असे कधी झाले नाही, असे म्हणत ही मागणी फडणवीस यांच्याकडून पूर्ण करून घेतली. राऊत यांच्या अपेक्षेपेक्षा दुप्पट निधी मंजूर करत असल्याचे दाखवून दिले. 

शिंदे यांची डोकेदुखी वाढली.
नगराध्यक्ष राऊत यांनी वाढदिवसानिमित्त शक्तिप्रदर्शन शिंदेची काळजी वाढवली. २७ मार्चला राऊत यांनी वाढदिवसानिमित्त तालुक्यात आणि शहरात मोठे शक्तिप्रदर्शन करत आपली हवा निर्माण केली. आपल्यावर प्रेम करणारे स्थानिक लोकप्रतिनिधी आणि जनतेचा विश्वास किती आहे, हे त्यांनी दाखवून दिले. विधानसभेची पूर्वतयारी राऊत यांनी अजमावली अशी चर्चा सध्या सुरू आहे. २०१९ च्या विधानसभेत राऊत हे शिंदे यांच्यासमोर आव्हान निर्माण करू शकतात. त्यामुळे शिंदे यांची डोकेदुखी वाढली आहे.
-------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
---------------------------
विरोधक अजून तरी शांत. 
पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होणार आहे. राम शिंदे यांनी सरकारमध्ये असलेले राजकीय वजन आणि मंत्रिपदाच्या जोरावर विकासकामांचा धडाका लावला. कर्जत नगरपंचायतीवर नामदेव राऊत यांनी चाणाक्ष नेतृत्वाने एकहाती सत्ता मिळवत प्रथम नगराध्यक्ष होण्याचा मान मिळवला. त्यांनीही नगराध्यक्षपदाच्या काळात कर्जतचा चेहरामोहरा बदलला. इतर पक्षातील नेते मात्र शांत आहेत. त्यामुळे शिंदे विरुद्ध राऊत असाच डाव रंगेल का, अशी चर्चा जोर धरत आहे. 

राऊत यांना मिळू शकते जनतेची पसंती. 
कर्जत-जामखेड मतदारसंघात माजी आमदार विठ्ठलराव भैलुमे हेच कर्जतचे एकमेव आमदार झाले. वास्तविक कर्जत तालुक्यात सर्वाधिक मते आहेत. मात्र, स्थानिक नेत्यांतील असणारी दुफळीमुळे भैलुमे यांच्यानंतर कर्जतचा आमदार झाला नाही. यावेळी मात्र इतर पक्षांत असणारी शांतता आणि नुकतेच नामदेव राऊत यांनी केलेले शक्तिप्रदर्शन हा संयोग जुळून आला आहे. त्यामुळे पुढील विधानसभेत स्थानिक म्हणून राऊत यांना पसंती मिळू शकते.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.