बाळासाहेब पवारांना कर्ज देणारा सावकाराचा 'बॉस' वेगळाच !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- उद्योजक बाळासाहेब पवार यांना कर्ज देणारा सावकार नवनाथ विठ्ठल वाघ याचा केवळ शेती व्यवसाय आहे. केवळ तेवढ्यावर तो एवढ्या मोठ्या रकमेचे कर्ज कसे देऊ शकतो? शिवाय पवार यांच्याकडून वसूल केलेली कोट्यवधी रुपयांची रक्कम कोठे ठेवली, याची माहिती आरोपीकडून मिळत नाही. त्यामुळे आरोपी वाघ याचा 'बिग बॉस' वेगळाच असून तो केवळ वसुली करणारा प्यादे असावा, असा संशय पोलिसांना आहे. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
त्यादृष्टीने तपास करायचा असल्याची माहिती पोलिसांनी बुधवारी न्यायालयात दिली.ओम उद्योग समूहाचे मालक, उद्योजक बाळासाहेब पवार यांच्या आत्महत्येप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात चार जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी 

नवनाथ विठ्ठल वाघ (रा. बुरुडगाव) याला अटक केली आहे. वाघ याची बुधवारी पोलिस कोठडी संपली असल्यामुळे त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्याच्या पोलिस कोठडीची मुदत २० एप्रिलपर्यंत वाढवली आहे.
-------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
---------------------------
याप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपीचा मुख्य व्यवसाय शेती असून त्याचे शेतीमधून मिळणाऱ्या उत्पन्नामधून तो मृत पवार यांना व्याजाने पैसे कसे काय देत होता, हे सांगण्यास आरोपी टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे आरोपीचा वापर करून पवार यांच्या पेट्रोलपंपावर पैसे नेले जात असावेत. पेट्रोलपंपावरून पैसे घेऊन आरोपी ते कोणाला देत होता, याचा शोध घ्यायचा असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच मृत पवार यांचे मदतनीस म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीचा जबाबदेखील पोलिसांनी घेतला आहे. 
दरम्यान, या प्रकरणातील अन्य आरोपी अद्याप फरारी आहेत. घटना घडल्यापासून या प्रकरणाबद्दल शहरात वेगवेगळ्या चर्चा सुरू होत्या. कर्ज देणारे आणि त्यांच्या पाठिराखे यांच्याबद्दलही संशय व्यक्त केला जात होता. पोलिसांच्या तपासातही आता अशाच गोष्टी पुढे येऊ लागल्या आहेत; मात्र, आरोपी पोलिसांना माहिती देत नसल्याने अन्य आरोपींच्या अटकेची पोलिसांना प्रतीक्षा आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.