केडगाव हत्याकांड : गुन्ह्याची उकल होण्याची शक्यता ?

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :केडगावमधील शिवसैनिकांच्या हत्याकांड प्रकरणी रवी खोलम याला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे, अशी माहिती मिळते. शिवसैनिकांच्या हत्येनंतर नगरमध्ये विविध पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते यांची पोलीस चौकशी सुरू आहे. रवी खोलम याच्या अटकेमुळे गुन्ह्याची उकल होण्याची शक्यता मानली जात आहे.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
नगरमधील केडगावमध्ये शिवसैनिकांच्या हत्येनंतर काँग्रेसचा केडगाव येथे नुकताच निवडून आलेला नगरसेवक विशाल कोतकर व त्याचा सहकारी रवी खोलम हे पोलिसांच्या रडारवर होते. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथकं तयार केली होती. अखेर आज रवी खोलम याला अटक करण्यात आली. विशाल कोतकर याचा तपास सध्या सुरू आहे.
-------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
---------------------------
दरम्यान, शुक्रवारी रात्री या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेले आरोपी संदीप बाळासाहेब गिऱ्हे व महावीर रमेश मोकळे या दोघांनी केडगाव दुहेरी हत्याकांडाशी आपला काहीही संबंध नसल्याचे प्राथमिक चौकशीत पोलिसांना सांगितले असल्याची माहिती मिळते आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.