पोलिसांमार्फत शिवसेनेने नगरसेवक कैलास गीरवलेंची हत्या केली.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :आमदार संग्राम जगताप हे राजकारणात वरचढ झाले आहेत. त्यांचा निवडणुकीत पराभव करता येणार नाही, या भीतीपोटी शिवसेनेने सत्तेचा वापर करत जगताप व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना खोट्या गुन्ह्यात गोवले. पोलिसांवर दबाव आणून त्यांनी हे खोटे गुन्हे दाखल करायला लावले. नगरचे पोलिस आता शिवसैनिक झाले आहेत. शिवसेनेने पोलिसांमार्फत नगरसेवक कैलास गिरवले (मामा) यांची हत्या केली, असा आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला. याप्रकरणी मुख्यमंत्र्यांना ठिकठिकाणी घेराव घालण्याचा इशाराही त्यांनी दिला.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
गिरवले यांच्या कुटुंबाची भेट घेतल्यानंतर मुंडे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले उपस्थित होते. केडगाव दुहेरी हत्याकांड, पोलिस अधीक्षक कार्यालयाची तोडफोड, तसेच पोलिसांच्या मारहाणीत नगरसेवक गिरवले यांचा झालेला मृत्यू या पार्श्वभूमीवर मुंडे बुधवारी नगरला आले होते. त्यांनी पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांचीही भेट घेतली. 

गिरवले यांच्या मृत्यूस जबाबदार असलेले पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तत्काळ कारवाई करा, तसेच राष्ट्रवादीचे आमदार जगताप व कार्यकर्त्यांवर दाखल करण्यात आलेले खोटे गुन्हे मागे घ्या, अशी मागणी त्यांनी शर्मा यांच्याकडे केली.

त्यानंतर सायंकाळी मुंडे यांनी शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, केडगाव हत्याकांडाचा आम्ही निषेध करतो. ही दुर्दैवी घटना असून आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे. त्याचबरोबर पोलिस अधीक्षक कार्यालयावर हल्ला करणाऱ्यांवरही कारवाई झाली पाहिजे. तथापि, पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल करू नयेत. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दादा कळमकर यांचा घटनेशी काहीही संबंध नसतानाही त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. हे पटण्यासारखे नाही. 
-------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
---------------------------
शिवसेनेने राजकीय स्वार्थापोटी केडगाव हत्याकांडाचे भांडवल केले. सत्तेचा गैरवापर करत जगताप व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्यास पोलिसांना भाग पाडले. गृहराज्यमंत्री नगरमध्ये येऊन बसतात, पोलिसांवर दबाव टाकतात. पोलिसही खुशाल खोटे गुन्हे दाखल करतात. त्यामुळे नगरचे पोलिस शिवसैनिक झाले असल्याचे चित्र असल्याचे मुंडे यांनी सांगितले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.