अहमदनगर पेटले असताना पालकमंत्री राम शिंदे कार्यकर्त्यांच्या लग्नात बिझी !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- गेल्या दोन आठवड्यात नगर शहरात सेनेच्या दोन कार्यकर्त्यांचे खून, पोलिसांवरील हल्ले तसेच पोलीस अधीक्षक कार्यालय तोडफोड, कोठडीतील आरोपी नगरसेवकाचा मृत्यू, सावकाराच्या जाचातून उद्योजकाची आत्महत्या असे स्फोटक वातावरण झालेले असताना जिल्ह्याचे कारभारी पालकमंत्री प्रा. राम शिंदे ब्र काढायला तयार नाहीत. कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाल्याने शासन-प्रशासनाची छी थू झाली असतानाही जिल्ह्याच्या मुख्यालयाकडे डोळेझाक करीत पालकमंत्री कार्यकर्त्यांच्या लग्नात ते व्यस्त आहेत. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
पालकमंत्री शिंदे जिल्ह्याच्या दौर्यावर येत आहेत. त्यात मृतांच्या कुटुंबियांना भेट असे नियोजन नाही. उलट मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या घरची लग्न उलगडण्यात त्यांना रस आहे. उत्तरेतही ते विवाह सोहळ्यास हजेरी लावणार आहेत.यावरून त्यांना नगर शहराविषयी किती आस्था आहे दिसून येते.

कार्यकर्त्यांच्या लग्नाला जाण्यात काहीच वावगे नाही. मात्र, त्याबरोबर मृतांच्या कुटुंबियांना जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून नव्हे किमान माणुसकीच्या नात्याने भेट घेता आली असती. यावरून कोणी विरोधकांनी राजकारण केले असते तर तेच तोंडघशी पडले असते. मात्र, पालकमंत्र्यांच्या दौर्यात तसे नियोजन नाही.

केडगाव घटनेने पालकमंत्र्यांची कोंडी !
केडगावच्या पोटनिवडणुकीत भाजपाच्या उमेदवाराचे डिपॉजिट जप्त झाले. तेथे भाजपाचा उमेदवार तिसर्या क्रमांकावर होता. याबाबत कोणीच खुलासा केला नाही. चार दिवसांनंतर खासदार दिलीप गांधी बोलले. विरोधकांनी पैसे वाटल्याचा त्यांचा आरोप होता. पालकमंत्री काहीच बोलले नाही.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.