कर्जबाजारीपणास कंटाळून जामखेड तालुक्यातील शेतकऱ्याची आत्महत्या.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :जामखेड तालुक्यातील सरदवाडी येथील धोंडीराम भानुदास शिरसाट (वय ४२) या तरूण शेतकर्याने कर्जबाजारीपणास कंटाळून बुधवारी पहाटे आत्महत्या केली.बुधवारी पहाटे ६ वाजेपूर्वी धोंडीराम यांनी अशोक रामा गाडे यांच्या शेतातील आंब्याच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
भारतीय स्टेट बँकेकडून कर्ज काढून ते ऊस तोडणीसाठी गेले होते. परंतु जमीन दीड एकर असल्याने त्यातून मिळणाºया जेमतेम उत्पन्नामुळे बँकेचे कर्ज भरणे अवघड झाले होते. त्यातूनच आलेल्या नैराश्यातून बुधवारी गळफास घेऊन त्यांनी आपली जीवनयात्रा संपविली. 

त्यांच्या पाठीमागे दोन मुले व पत्नी आहे. याबाबत जामखेड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक नितीन पगार यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकाँस्टेबल शबाना शेख तपास करीत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.